शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भैरवी थाटात रंगणार ‘स्वरविलास’

By admin | Updated: May 10, 2017 04:20 IST

‘थाट’ या संकल्पनेतून साकारलेल्या ‘स्वरविलास’ या संवाद आणि सांगीतिक मैफलीतून दिग्गज गायकांना ऐकण्याची संधी पुणेकर रसिकांना

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ‘थाट’ या संकल्पनेतून साकारलेल्या ‘स्वरविलास’ या संवाद आणि सांगीतिक मैफलीतून दिग्गज गायकांना ऐकण्याची संधी पुणेकर रसिकांना उपलब्ध झाली आहे. दि. १३ रोजी मयूर कॉलनी येथील बालशिक्षण मंदिरच्या एमईएस आॅडिटोरियम येथे सायंकाळी ५.३० वाजल्यापासून, तर १४ मे रोजी कर्वे रस्त्यावरील आबासाहेब गरवारे महाविद्यालय येथे सकाळी ९ वाजल्यापासून हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य खुला असल्याची माहिती संयोजक विलास जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शास्त्रीय गायक पं. शौनक अभिषेकी, पं. संजीव अभ्यंकर आणि पं. हेमंत पेंडसे आदी मान्यवर उपस्थित होते.मैफलीची सुरुवात पं. हेमंत पेंडसे यांच्या गायनाने होईल. त्यानंतर पं. कुमार गंधर्व यांच्या कन्या पं. कलापिनी कोमकली यांचे गायन होणार आहे. पहिल्या दिवसाच्या मैफलीचा समारोप पं. शौनक अभिषेकी यांच्या संध्याकाळच्या रागाने होईल. १४ मे रोजी गायिका अनुराधा कुबेर व पं. संजीव अभ्यंकर यांच्या खास सकाळच्या रागांची मैफल आयोजित करण्यात आली आहे. कर्वे रस्त्यावरील आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी ९ पासून हा कार्यक्रम होईल. रवींद्र खरे कलाकारांशी संवाद साधतील. भरत कामत, प्रशांत पांडव (तबला) व सुयोग कुंडलकर, चैतन्य कुंटे (संवादिनी) कलाकारांना साथसंगत करतील.