टाकवे बुद्रुक : टाकवे बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्वामी बबन जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सरपंच जिजाबाई गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही निवड झाली. अविनाश असवले यांचा पदाचा कार्यकाल संपल्याने पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंचपद रिक्त झाले होते. जगताप यांची निवड झाल्याने नंदू असवले, अविनाश असवले, दत्ता घोजगे, सागर भोंगाडे यांनी त्यांचा सत्कार केला. शिवाजी असवले, भूषण असवले, अनिल असवले, बाबाजी गायकवाड, नवनाथ आंबेकर, चिंधू घोजगे, अकुश आंबेकर व सर्व सदस्य उपस्थित होते. या वेळी समर्थकांनी ढोल-लेझीम पथकासह गुलाल-भंडारा उधळीत मिरवणूक काढली. (वा.प्र.)
टाकवे उपसरपंचपदी स्वामी जगताप
By admin | Updated: October 6, 2016 03:11 IST