कंटेनर नदीत पडल्याचा संशय?
By admin | Updated: January 12, 2017 01:58 IST
पुणे-सातारा महामार्गावरील सारोळा (ता. भोर) येथील दोन्ही पुलांच्या मधून कंटेनर नीरा नदीत पडला असल्याच्या संशयावरून
कंटेनर नदीत पडल्याचा संशय?
नवी मुंबई : पालिकेच्या उद्यान अधिकार्याने वंडर्स पार्कमध्ये नागरीकांना मोफत प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्याने रविवारी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. हजारो नागरीकांनी उद्यानामध्ये अक्षरश: गोंधळ घातला. सुदैवाने मालमत्तेची हानी झाली नसली तरी या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. नवी मुंबईमधील लँडमार्क म्हणून नेरूळमधील वंडर्स पार्क ओळखले जाते. उद्यानाची देखभाल करण्याच्या ठेक्याची मुदत ३१ डिसेंबरला संपली. स्थायी समितीची पुढील वर्षासाठी मुदतवाढ मिळाली नसल्याने ठेकेदाराने नियमाप्रमाणे काम थांबविले. महापालिकेने पर्यायी व्यवस्था केली नाही. अशा स्थितीमध्ये उद्यान बंद ठेवण्याऐवजी नागरीकांना उद्यानामध्ये मोफत प्रवेश देण्याचा निर्णय उद्यान अधिक्षक भालचंद्र गवळी यांनी घेतला. मोफत प्रवेश असल्याने उद्यानामध्ये नागरीकांनी प्रचंड गर्दी केली. येथील तलावामध्ये उतरून एकमेकांवर पाणी उडविण्यास सुरवात केली. जागतीक सात आश्चर्याच्या प्रतिकृती व हायटेक राईडवर बसून अनेकांनी फोटोसेशन सुरू केले. बेशीस्त नागरीकांनी राईडवर उड्या मारण्यास सुरवात केली. नागरीकांना शिस्त पाळण्याच्या सुचना देण्यासाठी काही कर्मचारी गेले असता त्यांना दमदाटी करण्यात आली. यामुळे कर्मचार्यांनीही तेथून पलायन केले. वंडर्स पार्क उभारण्यासाठी पालिकेने जवळपास ३५ कोटी रूपये खर्च केले आहेत. देखभाल करण्यासाठी महिन्याला लाखो रूपये खर्च केले जात आहेत. उद्यानामधील मौल्यवान वस्तूंची देखभाल करण्यासाठी आवश्यक कर्मचारी व सुरक्षा रक्षक नसताना उद्यान बंद ठेवणे आवश्यक होते. परंतु उद्यान अधिक्षकांनी नागरीकांना मोफत प्रवेश देवून पालिकेची मालमत्ता असुरक्षीत बनविली. या प्रकरणी चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे. चौकट गोंधळ घालणार्यांवरही हवी कारवाई वंडर्स पार्कमध्ये गोंधळ घालणार्या नागरीकांची छायाचीत्रेही प्रसिद्ध झाली आहेत. महापालिकेच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जात आहे. पालिका आयुक्त तुकाराम मुंढे या प्रकरणी काय भुमीका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चौकटकॅमेरे नाहीत ३५ कोटीपेक्षा जास्त खर्च केलेल्या वंडर्स पार्कमध्ये सीसी टिव्ही कॅमेरे बसविण्यात आले नाहीत. यामुळे उद्यानातील हालचालींवर लक्ष ठेवता येत नाही. उद्यानामध्ये कोणी गैरप्रकार केले किंवा घातपाती कारवाई झाली तर सुरक्षेसाठी काहीच ठोस उपाययोजना नाही. फोटो02नेरूळ, नावाने आहेत