शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीच्या दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

By admin | Updated: July 13, 2016 00:58 IST

स्वारगेट येथील पीएमपीच्या मुख्य इमारतीतील महिला स्वच्छतागृहात मोबाईलवर चित्रीकरण केल्याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांवर मंगळवारी निलंबनाची कारवाई करण्यात

पुणे : स्वारगेट येथील पीएमपीच्या मुख्य इमारतीतील महिला स्वच्छतागृहात मोबाईलवर चित्रीकरण केल्याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांवर मंगळवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. सोमवारी ( दि.१२) सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान, या कर्मचाऱ्यांमधील एक कर्मचारी पीएमपीचा क्लीनर असून, दुसरा कर्मचारी शिकाऊ संगणक आॅपरेटर म्हणून काम करत आहे. यातील पीएमपीच्या कर्मचाऱ्याची विभागीय चौकशी केली जाणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले. या बाबतचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने दिले होते. त्याची गंभीर दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनीही आज दुपारी पीएमपी कार्यालयात जाऊन चौकशी केली. त्यानंतरही या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे दिसून आले. स्वारगेट येथील पीएमपीच्या मुख्य इमारतीमधील पहिल्या मजल्यावर महिला आणि पुरुषांसाठी शेजारी-शेजारी स्वच्छतागृह आहे. दोन्ही स्वच्छतागृहांमध्ये केवळ पार्टिशन आहे. तेथील एक महिला कर्मचारी स्वच्छतागृहात गेल्या असताना त्यांना पार्टिशनमधून एका गुलाबी रंगाच्या मोबाईलवर चित्रीकरण केले जात असल्याचे आढळले. त्यानंतर संबंधित महिला आरडाओरडा करून शिपायाला बोलावण्यास गेल्या. तेवढ्या वेळेत कोणीतरी तो मोबाईल काढून घेऊन गेल्याचे आढळून आले. त्या वेळी तेथून जाणाऱ्या दोघांवर या महिला कर्मचाऱ्यांनी संशय व्यक्त केला होता. तसेच अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांकडे कारवाई करण्याबाबत लेखी तक्रारही दिली होती. त्यानुसार, पीएमपीचा अतिरिक्त पदभार असलेले महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी या प्रकरणाची माहिती घेऊन दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याचे प्रभारी सह व्यवस्थापकीय संचालक सुषमा कोल्हे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.