शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘मालधक्का बंद’च्या आंदोलनाला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 00:59 IST

पुणे : कोणतीही कल्पना न देता बंद करण्यात आलेला पुणे रेल्वेस्टेशन येथील मालधक्का पुन्हा सुरू करावा, या मागणीसाठी १५ दिवसांपासून हमाल संघटना व हुंडेकरी असोसिएशनने सुरू ठेवलेले ‘धरणे आंदोलन’ खासदार अनिल शिरोळे यांच्या आश्वासनानंतर, स्थगित करण्यात आले;

पुणे : कोणतीही कल्पना न देता बंद करण्यात आलेला पुणे रेल्वेस्टेशन येथील मालधक्का पुन्हा सुरू करावा, या मागणीसाठी १५ दिवसांपासून हमाल संघटना व हुंडेकरी असोसिएशनने सुरू ठेवलेले ‘धरणे आंदोलन’ खासदार अनिल शिरोळे यांच्या आश्वासनानंतर, स्थगित करण्यात आले; परंतु महिनाभरात यावर मार्ग न निघाल्यास निर्णायक स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असे हमाल पंचायत, ट्रान्स्पोर्ट व डॉक वर्कर्स युनियन व हुंडेकरी असोसिएशन आदी संघटनांनी जाहीर केले.रेल्वे प्रशासनाच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ व मालधक्का पुन्हा सुरू करण्याच्या मूळ मागणीसाठी विविध संघटनांनी ११ डिसेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते; तसेच बाजार बंद ठेवून विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयावरही मोर्चा काढण्यात आला; मात्र रेल्वे प्रशासनाने आडमुठी भूमिका कायम ठेवली; परंतु रेल्वे व्यवस्थापक कार्यालयासमोरील सभेत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी घेण्यात आलेल्या सभेला खासदार अनिल शिरोळे यांनी हजेरी लावली. याप्रसंगी डॉ. बाबा आढाव, नितीन पवार, राजेंद्र तरवडे, सुहास जोशी उपस्थित होते.कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता व पूर्वकल्पना न देता मालधक्का बंद करण्याचा निर्णय योग्य नाही. हे चांगल्या प्रशासनाचेही लक्षण नाही. त्यामुळे हा विषय रेल्वे मंत्र्यांपर्यंत घेऊन गेलो आहे, असे शिरोळे यांनी सांगितले; तसेच प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून, रेल्वे व मनपा प्रशासनाची संयुक्त बैठक घेतली जाणार आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. त्यामुळे आंदोलन तूर्तास थांबवावे, असेही शिरोळे म्हणाले. दरम्यान, विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली. रेल्वे ट्रॅकजवळील झोपड्या काढण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर प्रयत्न करीत असून, पालिका व पोलीस प्रशासन यांच्या संपर्कात आहोत. पोलीस बंदोबस्तासाठी पैसेही भरले आहेत, असे देऊस्कर यांनी सांगितले. मालधक्का बंदच करण्याचा कोणताही विचार नसून अतिक्रमण काढून ट्रॅकची डागडुजी करून मालधक्का पुन्हा सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.