शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळासाठी आजपासून होणार सर्व्हे

By admin | Updated: November 15, 2016 03:56 IST

पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी मंगळवारपासून पुढील २५ ते ३० दिवस शासकीय जमिनींच्या (ओएलएस) सूक्ष्म सर्व्हेला सुरुवात होणार

खळद : पुरंदरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी मंगळवारपासून पुढील २५ ते ३० दिवस शासकीय जमिनींच्या (ओएलएस) सूक्ष्म सर्व्हेला सुरुवात होणार आहे. त्यानंतरच ही जागा विमानतळासाठी योग्य की अयोग्य, हे समजेल. ही मोजणी नसून केवळ सूक्ष्म सर्व्हे असून त्याला शेतकऱ्यांनी विरोध करू नये, असे आवाहन शासनाच्या वतीने पुरंदरचे तहसीलदार सचिन गिरी यांनी केले आहे. शेतकरी मात्र त्यांच्या असहकाराच्या भूमिकेवर ठाम आहेत. प्रसंगी गोळ््या घाला पण विमानतळ होऊ देणार नाही असा त्यांचा पवित्रा आहे. पारगाव, खानवडी, एखतपूर-मुंजवडी, वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण परिसरात पॉईंट घेऊन त्यापासून २० किमीपर्यंतच्या भागातील हवेचा दाब, वाऱ्याचा वेग, जमिनीचा उंचसखलपणा, डोंगर या बाबींचा अभ्यास करण्यासाठी हा सर्व्हे केला जाणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी, पुणे यांच्या आदेशानुसार पारगाव मेमाणे, खानवडी, एखतपूर-मुंजवडी आणि या प्रकल्पात नव्याने समावेश झालेल्या कुंभारवळण, वनपुरी-उदाचीवाडी या गावांत शासकीय सर्व्हेबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी आणि याकामी शेतकऱ्यांनीसहकार्य करण्याचे आवाहन करण्यासाठी सोमवारी शासनाच्या वतीने बैठका घेण्यात आल्या. या वेळी तहसीलदार सचिन गिरी यांच्यासमवेत उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते, सासवडचे पोलीस निरीक्षक एस. आर. गौड, मंडलाधिकारी संजय बडधे, पोलीस उपनिरीक्षक गणेश पिंगुवाले आदी उपस्थित होते.