शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

डीएसकेपुत्र न्यायालयाला शरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 03:18 IST

ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांचे पुत्र शिरीश कुलकर्णी सोमवारी

पुणे : ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांचे पुत्र शिरीश कुलकर्णी सोमवारी सायंकाळी शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयाला शरण आले. विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी त्यांना २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.शिरीश कुलकर्णी यांचा जामीन अर्ज फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना एका आठवड्यात पोलिसांना शरण जाण्याचे आदेश मंगळवारी दिले होते. एका आठवड्याची मुदत संपत आल्याने शिरीश हे पोलिसांनी शरण आले आहेत. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस. कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती यांच्यासह १९ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी शिरीष यांच्याविरूद्धही पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिरीश यांना न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. सर्वोच्च न्यायालयानेत्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शिरीश सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांच्या न्यायालयात हजर झाले. सुनावणी न्यायाधीशांच्या अंतर्गत केबीनमध्ये घेण्यात आली.डीएसके यांनी केलेल्या फसवणुकीची व्याप्ती मोठी आहे. ठेवीदारांकडून गोळा केलेले पैसे शिरीश यांच्या बँकखात्यात वळविण्यात आले आहेत. त्यादृष्टीने पोलिसांना तपास करायचा आहे, त्यामुळे सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली.शिरीश हे २०१६ मध्ये डीएसकेंच्या सर्व कंपन्यांमधून निवृत्त झाले आहेत. ठेवीदारांना जे चेक दिले गेले आहेत. त्यावर शिरीश यांची सही नाही. ते गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यास जबाबदार नाहीत. बँकांनी दिलेल्या कर्जप्रकरणात शिरीश यांचा काही संबंध नाही, असा युक्तीवाद बचाव पक्षाच्या वतीने अ‍ॅड. सुशीलकुमार पिसे यांनी केला.