शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

"भाग गए रणछोड़ सभी, देख अभी तक खड़ा हूँ मैं" सुप्रिया सुळेंची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 20:19 IST

सोशल मिडीयावर सुळे या कायम सक्रिय असतात...

बारामती (पुणे) : खासदार सुप्रिया सुळे महाराष्ट्रात घडलेल्या सत्तानाट्याच्या पहिल्या दिवसापासून आपल्या वडिलांबरोबर खंबीरपणे उभ्या आहेत. पक्ष आणि कुटुंब फुटीनंतर देखील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याप्रमाणे सुळेदेखील नव्याने पक्ष बांधणीसाठी राजकीय मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी त्यासाठी कंबर कसल्याचे दिसून येते. दमलेल्या बापासाठी, लेक नारळाच पाणी; लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी, या कवितेद्वारे खासदार सुप्रिया सुळे सत्तानाट्याच्या पहिल्याच दिवशी सुळे यांनी मागे हटणार नसल्याचे संकेत दिले.

सोशल मिडीयावर सुळे या कायम सक्रिय असतात. शुक्रवारी (दि. ७) देखील त्यांनी, स्व. यशवंतराव चव्हाण यांची कविता पोस्ट केली आहे. आलं तर आलं तुफान-तुफानाला घाबरून काय करायचं, तुफानाला तोंड द्यायला शिकलं पाहिजे. तुफानापासून पळून जाणाऱ्या माणसाच्या हातून काही घडत नाही. तुफानाला तोंड देण्याची जी शक्ती आणि इच्छा आहे. त्यातनं तो काहीतरी करू शकतो आणि घडवू शकतो, अशी माझी धारणा आहे. ही स्व. यशवंतराव चव्हाण ७ मे १९८४  रोजी केलेली कविता आहे. ती पोस्ट करीत राजकीय संकटाला घाबरणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

शनिवारी शरद पवार यांचा एका सभेतील पावसात भिजल्यावर गाडीत बसतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्या फोटोखाली भाग गऐ रणछोड सभी, देख अभी तक खडा हूँ मैं, ना थका हूँ ना हारा हूँ, रण में अटल तक खडा हूँ मैं, या शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे वर्णन केले आहे. सोशल मिडीयावर या पोस्टला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांची वाट खडतर झाल्याचे दिसुन येते. त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात नव्याने पक्ष बांधणीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे कोणती रणनीती आखतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळेBaramatiबारामती