शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

गणाधिपतीसमोर ‘सूरमैफल’; संगीताची सेवा करणाऱ्या कुटुंबाचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 03:12 IST

संगीत क्षेत्रातील एका कलासक्त कुटुंबाच्या घरात चौसष्ठ कलांचा अधिपती असलेल्या श्रीगणेशासमोर दहा दिवसांच्या मैफलीद्वारे सुरांचा अनोखा नजराणा पेश केला जातोय.

- नम्रता फडणीस पुणे : संगीत क्षेत्रातील एका कलासक्त कुटुंबाच्या घरात चौसष्ठ कलांचा अधिपती असलेल्या श्रीगणेशासमोर दहा दिवसांच्या मैफलीद्वारे सुरांचा अनोखा नजराणा पेश केला जातोय. ना मोठा स्वरमंच ना प्रथितयश कलाकार. केवळ उदयोन्मुख कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हेच या मैफलीचे वैशिष्ट्य आहे. प्रसिद्ध गायिका अपर्णा गुरव व त्यांच्या कुटुंबीयांनी यंदाच्या वर्षीपासून घरातच ही सूरमैफल सुरू केली आहे.कलानिधी प्रस्तुत आणि गणपती संगीतोत्सव २०१८ च्या माध्यमातून ही मैफल होत आहे. अपर्णा गुरव, त्यांची मुलगी व सून तिघीही गायिका, पती मिलिंद गुरव आणि मुलगा प्रणव गुरव तबलावादक असे हे कलेची नि:स्पृहपणे सेवा करणारे कुटुंब. एक कलाकार दुसºया कलाकाराचे कौतुक करायला फारसे पुढे येत नाही. पण हे कुटुंब इतर कलाकारांच्यादेखील कलेला प्रोत्साहन देण्याचे काम अत्यंत मनापासून करीत आहे, हेच या कुटुंबाचे मोठेपण म्हणता येईल. घरात सजणाºया या अभिनव मैफलीविषयी ‘लोकमत’शी बोलताना गायिका अपर्णा गुरव म्हणाल्या, आमच्या ‘कलानिधी’ संस्थेद्वारे सदस्य नोंदणीच्या माध्यमातून वर्षभर विविध सांगीतिक कार्यक्रम राबविले जातात. जेव्हा घरातच सूरमैफल आयोजित करण्याची कल्पना पुढे आली तेव्हा अनेक कलाकारांनी उत्साह दाखवित या उपक्रमाला पसंती दर्शविली. त्यामुळेच यंदाच्या वर्षीपासून आम्ही घरातल्या कलाधिपतीसमोर या मैफलीचा ‘श्रीगणेशा’ केला. गायन- वादन अशा द्विसंगमातून साकार झालेल्या या दहा दिवसीय मैफलीत नवोदित कलाकारांचे अविष्कार ऐकण्याची संधी रसिकांना मिळत आहे. जे युवा कलाकार संगीतविश्वात फारसे प्रसिद्ध नाहीत, मात्र कलेमध्ये पारंगत आहेत त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. दहा दिवस रोज तीन कलाकारांचे या मैफलीत सादरीकरण होत आहे. घरातील जागा मर्यादित असली तरी रसिकमंडळी या मैफलीचा मनापासून आस्वाद घेत आहेत.दि. १३ ते १८ सप्टेंबर या पाच दिवसांत श्रृती बुजरबरूआ, साई ऐश्वर्य महाशब्दे ( गायन), रोहन भडसावळे (तबला सोलो), सैलुशा वाडपल्ली, उमेश साळुंके, जयंत केजकर (गायन), अनय गाडगीळ (हार्मोनिअम सोलो), अक्षता गोखले, केदार केळकर (गायन), रोहित मुजुमदार, विशाल मोघे (गायन), प्रणव गुरव (तबला सोलो),आदित्य जोशी, धनश्री घाटे (गायन), श्रीनिधी गोडबोले, भक्ती खांडेकर, अलकनंदा वैद्य (गायन) यायुवा कलाकारांनी आपली कलासेवा सादर केली आहे.पुढील चार दिवस सादरीकरण करणारे कलाकारदि. १९ सप्टेंबर : नीरज गोडसे , कोमल साने गुरव (गायन),रवी गाडगीळ (सतार)दि. २0 सप्टेंबर : मिलिंद गुरव (तबला सोलो), मानसी कुलकर्णी (गायन), ॠचा बेडेकर, उज्जैन (सरोद)दि. २१ सप्टेंबर : आदिश्री पोटे, श्रृती गुरव, ललित देशपांडे (गायन)दि. २२ सप्टेंबर : सावनी तळवलकर-गाडगीळ (तबला सोलो), अपर्णा गुरव (गायन)

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवPuneपुणेmusicसंगीत