पिंपरी : निगडीतील शिधापत्रिका कार्यालयात ‘आधार लिंकिंग’चे काम सुरू आहे. शहरातील २५ स्वस्त धान्य दुकानदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. उर्वरित २५० दुकानदारांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. नागरिकांचाही अल्प प्रतिसाद मिळत आहे. पूर्वी दिलेला आधार क्रमांक, त्या आधार क्रमांकावर मिळणारे धान्य, कुटुंबातील सदस्य संख्या आदींची तपासणी केली जात आहे. बायोमेट्रिक शिधापत्रिकेसाठी आधार कार्ड झेरॉक्स, संबंधित कुटुंबातील महिलेचे बँक खाते किंवा संयुक्त खाते, संबंधित रेशनधान्य दुकानदाराकडील अर्ज इत्यादी कागदपत्र निगडी शिधापत्रिका कार्यालयाकडे जमा करावयाचे आहेत. एक लाख ७१ हजार शिधापत्रिकाधारक या कार्यालयाच्या अखत्यारित आहेत. यापैकी ७१ हजार शिधापत्रिकाधारक आहेत. त्यांना ‘आधार लिंकिंग’ कामासाठी वारंवार मुदत वाढ दिली जात आहे.स्वस्त धान्य असणाऱ्या दुकानदारांच्या मागण्या शासनाकडून मान्य केल्या जात नाहीत. अशी परिस्थिती असल्यामुळे दुकानदारांनीही शासनाला मदत न करण्याची भूमिका घेतली आहे. ‘आधार लिंकिंग’ सक्तीचे केले आहे. (प्रतिनिधी)
‘आधार लिंकिंग’कडे होतेय दुर्लक्ष
By admin | Updated: January 23, 2017 02:44 IST