पुणे : हमाल पंचायत कष्टाची भाकर उपक्रमास नियंत्रित दराने धान्य पुरवठा पुर्ववत करण्यासंदर्भात ज्येष्ठ नेते डाॅ. बाबा आढाव यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी डाॅ. बाबा आढाव यांनी सद्य परिस्थितीचा आढावा भुजबळ यांना दिला. त्यानंतर भुजबळ यांनी धान्य पुरवठा कसा सुरळितपणे चालु करता येईल, याबाबत लवकरच संबंधित अधिकारी व बाबा यांच्यामधे संयुक्तरित्या चर्चा करुन योग्य तो मार्ग काढण्याबाबतचे सांगण्यात आले. धान्य पुरवठा हा केंद्र सरकराकडुन होत असतो. त्यामुळे सर्व बाबींचा विचार करुन बाबांनी एक पर्याय दिला तर सदर विषयाबाबत लवकरात लवकर निर्णय घेणे सोपे होईल. असे देखील भुजबळ यांनी सांगितले. यावेळी श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड कामगार युनियनचे अध्यक्ष किसन काळे, सचिव संतोष नागरे, खजिनदार विजय चोरघे हमाल पंचायत कष्टकरी भाकरीचे चंद्रकांत मानकर, दिलीप मानकर, गोरख मेंगडे तसेच अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीचे निमंत्रक नितीन पवार उपस्थित होते.
कष्टाची भाकर उपक्रमाला शासनाकडून धान्य पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:07 IST