शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अधीक्षक आले शेतावर, ‘आत्मा’ अंतर्गत पाहणी : शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 00:04 IST

महुडे : महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पुणे अंतर्गत भोर तालुक्याच्या पाश्चिम भागातील दुर्गम डोंगरी भागातील महुडे खुर्द येथे राबविलेल्या यांत्रिकी भात लागवड प्रात्यक्षिकास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पुणे बी. जी. पडघलमल यांनी भेट देऊन पाहणी केली.या वेळी तालुका कृषी अधिकारी एस. व्ही. वडखेलकर, मंडळ कृषी ...

महुडे : महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पुणे अंतर्गत भोर तालुक्याच्या पाश्चिम भागातील दुर्गम डोंगरी भागातील महुडे खुर्द येथे राबविलेल्या यांत्रिकी भात लागवड प्रात्यक्षिकास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पुणे बी. जी. पडघलमल यांनी भेट देऊन पाहणी केली.या वेळी तालुका कृषी अधिकारी एस. व्ही. वडखेलकर, मंडळ कृषी अधिकारी राजेंद्र डोंबाळे, कृषी पर्यवेक्षक के. बी. राऊत, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक लक्ष्मीकांत कणसे, कृषी सहायक पी. जी. भोये, डी. के. कवितके , बी. एस. ढाकणे हे उपस्थित होते. तालुका कृषी अधिकारी एस. व्ही. वडखेलकर यांनी कृषी यांत्रिकीकरण योजनेची माहिती दिली.

यांत्रिकी भातलागवड करण्यासाठी यांत्रिकरण योजनेअंतर्गत अनुदानावर भात लावणी यंत्रखरेदी करण्याचे आवाहन केले. शेतकºयांना मागील वर्षाची लागवड खर्च व आलेले उत्पादन; तसेच चालू वर्षाचा यांत्रिकी भातलागवड खर्च व येणारे उत्पादन यातील फरक कडण्याबाबत मार्गदर्शन केले.यावेळी महुडे खुर्दचे सरपंच आकाश कुमकर प्रगतिशील शेतकरी सुदाम गोळे, निवृत्ती कुमकर, भरत कुमकर, शिवाजी बदक ,तसेच महिला शेतकरी रंजना गोळे, सिंधुबाई कुमकर व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.कृषी योजनांबाबत मार्गदर्शनकृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा )अंतर्गत भोर तालुक्यातील मोजे नाटंबी, महुडे खुर्द, सणसवाडी, हातवे, खानापूर येथील ५० एकर क्षेत्रावर यंत्राद्वारे भात लागवड करण्याची प्रात्यक्षिके राबविण्यात आलेली आहेत. यापैकी महुडे खुर्द येथील प्रात्यक्षिकास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पडघलमल यांनी भेट देऊन पाहणी केली. लाभार्थी शेतकºयांशी चर्चा केली.भातपिकातील लव्हाळी तणाचे नियंत्रण करणे, भातपिकातील भेसळ करणे, कामगंध सापळ्याची दररोज पाहणी करून किड्यांची मोजणी करणे, एका दिवसातील किड्याांचे प्रमाण ३ पेक्षा जास्त आढळल्यास प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, भात पिकावरील करपा व कडा करपा रोगाचा प्रादुर्भाव जाणवला तर करावयाच्या उपाययोजना बाबत मार्गदर्शन केले.

टॅग्स :Puneपुणे