सासवड : सासवड नगर परिषदेच्या अध्यक्षपदी आनंदीकाकी जगताप, तर उपनगराध्यक्षपदी सुहास लांडगे यांची बिनविरोध निवड झाली.
नगरपालिकेत आज (दि. 6) नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन केले होते. पीठासन अधिकारी म्हणून पुरंदरचे तहसीलदार संजय पाटील उपस्थित होते. नगरध्यक्षपदासाठी आनंदीकाकी जगताप यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे नगराध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे संजय पाटील यांनी जाहीर केले. त्यानंतर उपनगराध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. या पदासाठी सुहास दत्तात्नय लांडगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर झाली.
या वेळी विशेष सभेला मावळत्या नगराध्यक्षा नीलिमा चौखंडे, मावळते उपनगरध्यक्ष अजित जगताप, मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, नगरसेवक संदीप जगताप, मनोहर जगताप, योगेश गिरमे, वामनराव जगताप, रोहित इनामके, संजयनाना जगताप, नगरसेविका मीना वढणो, ज्योती गायकवाड, वसुधा आनंदे, प्रतिभा रणपिसे, शरयू शिंदे, निमर्ला जगताप, सुचेता भोंगळे त्याचबरोबर शिक्षण मंडळाचे माजी सभापती यशवंतकाका जगताप, प्रशासन अधिकारी राजीव मोहिते, मार्केट कमिटीचे ज्येष्ठ संचालक नंदकुमार जगताप आदी उपस्थित होते.
4आनंदीकाकी जगताप व सुहास लांडगे हे माजी नगराध्यक्ष चंदुकाका जगताप व युवानेते संजय जगताप यांच्या नेतृत्वाखालील जनमत विकास आघाडीचे नगरसेवक आहेत. जगताप या दुस:यांदा नगराध्यक्षपद भूषवीत आहेत. उपनगराध्यक्ष सुहास लांडगे यांची नगरसेवक म्हणून दुस:यांदा निवड झाली असून, त्यांना उपनगराध्यक्षपदाची प्रथमच संधी मिळत आहे. त्यांचे बंधू प्रदीप दत्तात्नय लांडगे 1985-86मध्ये सासवड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष होते.