शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

मानसिक व शारीरिक छळ करून सतत मारहाण होत असल्याने विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 01:22 IST

वेताळे (ता. खेड) येथे २२ वर्षीय विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून सतत मारहाण होत असल्याने विवाहितेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

राजगुरुनगर : वेताळे (ता. खेड) येथे २२ वर्षीय विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून सतत मारहाण होत असल्याने विवाहितेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुजाता शरद बोंबले (रा. वेताळे, ता. खेड) असे मृत महिलेचे नाव आहे. आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल नवरा, सासू-सासरा, दिर, नणंद यांच्यावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : सुजाता शरद बोंबले हिने सोमवारी (दि. २०) घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याबाबत विश्वास शिवाजी ढोले (वय २१, रा. नवलाखउंब्रे, वडगाव मावळ, जि. पुणे) याने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.पैसे परत देण्याच्या कारणावरून, तसेच नीट जेवण करता येत नाही व जेवणात मीठ नाही, म्हणून सतत शिवीगाळ, दमदाटी करून शारीरिक व मानसिक त्रास देऊन तिला क्रूर वागणूक देऊन तिचे जगणे असह्य करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे. याबद्दल वरील पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार मांडवे अधिक तपास करीत आहेत.सुजाता हिच्या बहिणीकडून नवरा शरद रोहिदास बोंबले, सासरा रोहिदास देवराम बोंबले, सासू लक्ष्मीबाई रोहिदास बोंबले, दिर महादेव रोहिदास बोंबले, नणंद प्रमिला सुभाष मांजरे यांनीउसने पैसे आणले होते. ते पैसे बहिणीला देऊन टाका, असे सुजाता नवरा शरद याला सांगत होती.

टॅग्स :Suicideआत्महत्याPuneपुणे