लोकमत न्यूज नेटवर्क
थेऊर : आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथील एका ३० वर्षीय महिलेने आपल्या दोन वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि. १०) संध्याकाळी ६ च्या सुमारास उघडकीस आला आहे.
कविता देविदास भोसले (वय ३०, रा. भेकराईनगर, मूळगाव उमरगा जि. उस्मानाबाद) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे तर प्रणीत देविदास भोसले (वय २) असे लहान मुलाचे नाव आहे. कविता आपल्या मुलासह मागील दोन दिवसांपासून बेपत्ता होती. तशी तक्रार कविताच्या नातेवाईकांनी हडपसर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार हडपसर पोलीस कविताचा शोध घेत होते. कविताच्या मोबाइलचे शेवटचे लोकेशन आळंदी म्हातोबाची येथे असल्याचे आढळले. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस व हडपसर पोलीस आळंदी म्हातोबाची गावाच्या परिसरात शोध घेत होते. यावेळी गायकवाडवस्ती येथील एका विहिरीत कविताचा आणि तिच्या मुलाचा मृतदेह आढळून आला. आत्महत्येचे कारण समजु शकले नाही. लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील कारवाई चालू आहे.
फोटो आहे
100921\screenshot_20210910-193850_whatsapp.jpg
आळंदी म्हातोबाची येथे दोन वर्षाच्या मुलासह विवाहितेची आत्महत्या