पाटेठाण : टेळेवाडी (ता. दौंड) येथे इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या सोनाली दीपक जाधव (वय १६) या मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. सोनाली ही राहू येथील कैलास विद्या मंदिरात शिकत होती़ ती वडील व आजीसह राहत होती. वडील मोलमजुरी करतात. आज वडील कामाला गेल्यानंतर तिने सकाळी घरातच आत्महत्या केली.
दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
By admin | Updated: September 2, 2016 05:47 IST