शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

ऊस उत्पादकांना पहिल्या हप्त्याची प्रतीक्षा

By admin | Updated: November 14, 2016 01:57 IST

राज्यातील साखर कारखानदारी जोमाने सुरु झाली आहे. राज्यासह जिल्हयात उसाची कमतरता असल्याने चालू गळीत हंगामात ऊस उत्पादकांना चांगला दर मिळणार आहे, यात शंकाच नाही.

राज्यातील साखर कारखानदारी जोमाने सुरु झाली आहे. राज्यासह जिल्हयात उसाची कमतरता असल्याने चालू गळीत हंगामात ऊस उत्पादकांना चांगला दर मिळणार आहे, यात शंकाच नाही. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश साखर कारखान्यांनी उसाचा पहिला हप्ता जाहीर केला आहे. मात्र, जिल्ह्यातील एकाही कारखान्याने अद्याप उसाचा पहिला हप्ता अजूनही जाहीर न केल्याने ऊस उत्पादकांना पहिल्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.पिढ्यान्पिढ्या ऊस उत्पादक शेतकरी हा कारखाने, राज्य शासन धोरण आणि पहिला हप्ता या चक्रव्यूहात अडकला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या उसाला चांगला दर मिळत नाही. नशिबाने गेल्या एक वर्षापासून साखरेला चांगले दर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला चांगले पैसे मिळण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. सन २०१३—१४ आणि २०१४—१५ या गळीत हंगामात साखरेचे दर नीचांकी पातळीवर गेले होते. त्यामुळे ऊसउत्पादकांना एफआरपी देण्यासाठी कारखान्यांच्या मदतीला अक्षरश: केंद्र सरकारला धावून यावे लागले होते. सन २०१३— १४ साली साखरेला २६०० रूपये प्रतिकिवंटल दर असताना राज्यात ६७५ लाख टन उसाचे गाळप झाले होते. त्या वेळी केंद्र सरकारने देशातील साखर कारखान्यांसाठी ६६०० कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज जाहीर केले होते. त्यावेळी राज्याच्या वाट्याला २२०० कोटी रूपये आले होते. त्यातून ऊस उत्पादकांना प्रति टनास ३०० रूपये मिळाले होते. त्याउलट सन २०१४-१५ च्या हंगामात साखरेचे दर २१०० रूपये एवढ्या नीचांकी पातळीवर आले. तर मागील वर्षाच्या तुलनेत राज्यातील ऊसगाळप २५५ लाख टनाने वाढून ते ९३० लाख टनांवर गेले. यावेळी केंद्राने मात्र राज्याच्या वाटयाला १८५० कोटी रूपयेच दिले होते. आज राज्यात ऊसाचे क्षेत्र घटले आहे. काही कारखाने दोन महिने चालतील ,तर काही ३ महिने सुरु राहतील. मात्र,अजूनही ऊस उत्पादकांना पहिली उचल किती मिळणार याची प्रतीक्षा आहे. गेल्या दिवाळीपासून साखरेला चांगले दर मिळू लागले आहेत.१९०० रूपये एवढ्या नीचांकी पातळीवर साखरेचे दर आल्याने साखर कारखानदारी कर्जाच्या खाईल गेली होती. मात्र, गेल्या वर्षभरात साखरेत तेजी राहिल्याने कारखानदारांसह ऊसउत्पादक समाधानी आहे. सध्या ३२०० ते ३३०० रूपये साखरेचे दर अजूनही वाढले असते. मात्र, नुकताच केंद्र सरकारने कोठ्याची मर्यादा ठरवून देत कारखान्यांना अधिक मिळण्याच्या आशेवर पाणी फिरविले. यामध्ये कारखान्यांनी सप्टेंबरअखेर ३७ टकके तर आॅकटोबरअखेर २४ टकके एवढीच साखर गोडावूनमध्ये ठेवता येईल असा आदेश काढला आहे. परिणामी भराभर वाढणारे दर आपोआप नियंत्रणात आले आहेत. गेल्या हंगामातही पैशांअभावी साखर कारखान्यांकडे पैसे नसल्याने एफआरपी ८०-२० च्या सूत्रानुसार दोन टप्प्यांत घ्यावी लागली. नुकतेच मुख्यमंत्री बारामती तालुक्यातील माळेगाव कारखान्यावर येऊन गेले. मुख्यमंत्री चालू गळीत हंगामातील पहिल्या उचलीबाबत काही बोलतील, असे समजून ऊसउत्पादकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. मात्र, शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली. राज्यभर ऊसदराचे आंदोलन करणारे खासदार राजू शेट्टी व सदाभाऊ खोत आज राज्य शासनाशी हातमिळवणी करत नरमाईची भूमिका घेत आहेत. शेतकऱ्यांना ते विसरलेले दिसत आहेत. त्यामुळे पहिला हप्त्यासाठी आंदोलन करणारा शेतकऱ्यांचा नेताच नसल्याने कारखाने ‘लॉबी’ करून जो दर ठरवितील तो शेतकऱ्यांना घ्यावाच लागणार आहे. त्यांना वालीच नसल्याने या हंगामातही ऊसउत्पादक दराबाबत भरडला जाण्याची शक्यता आहे.