तेरा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेले काही दिवस झाले उसाचे बिल मिळत नसल्याने अखेरीस दि.१० तारखेला सकाळी नऊपासून दुपारी चारपर्यंत शेतकरी उसाचे बिल मागणीकरीता कारखान्याच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला परंतू बिल मिळावे म्हणून शेतकऱ्यांनी भाजप तालुकाध्यक्ष जीवन कोंडे यांना तेथे बोलावून घेतले होते. त्यावेळी शेतकऱ्यांच्या बिलाचे चेक आजच्या आज देण्याची मागणी केली. त्यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक सुनील महिंद यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चेक तयार असल्याचे सांगत बिल पूर्ण मिळण्यात काही अडचण येत असल्याचे सांगत कारखान्याची बाजू मांडली. त्यावेळी कारखान्याचे अध्यक्ष आमदार संग्राम थोपटे यांनी कारखान्यांवर येऊन उपस्थित शेतकरी आणि कोंडे यांच्याशी चर्चा करून कारखान्याने यापूर्वीच फेब्रुवारीच्या तोडीचा पूर्ण रकमेचा चेक व मार्च महिन्यातील तोडीची अर्धी रक्कम चेकने मान्यता असल्याचे सांगितल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करून माघार घेतली.
ठिय्या आंदोलनामुळे मिळाले ऊस बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:10 IST