शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
4
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
5
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
6
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
7
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
8
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
9
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
10
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
11
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
12
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
13
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
14
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
15
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
16
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
17
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
18
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
19
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
20
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली

साखरेचे दर घसरले, राज्य बँकही मूल्यांकनात घट करण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:37 IST

सातत्याने घसरत असलेल्या साखरेच्या दरामुळे कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. राज्य बँकेकडूनही साखरेच्या मूल्यांकनात घट होण्याची शक्यता असल्याने साखर कारखानदारांची डोकेदुखी वाढणार आहे.

सोमेश्वरनगर : सातत्याने घसरत असलेल्या साखरेच्या दरामुळे कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. राज्य बँकेकडूनही साखरेच्या मूल्यांकनात घट होण्याची शक्यता असल्याने साखर कारखानदारांची डोकेदुखी वाढणार आहे. मागील महिन्यात साखरेच्या दरात तब्बल ३०० रुपयांची घसरण झाली आहे. ३२०० रुपये क्विंटलवर असणारे साखरेचे दर २९०० रुपयांवर आले आहेत.जानेवारीत साखरेच्या दरात घसरण झाली होती. त्या वेळी राज्य बँकेने मूल्यांकनही कमी केले आहे. त्यामुळे ऊसउत्पादकांना आता एफआरपी देणेही कठीण बनले होते. या नंतर साखरदरात पुन्हा सुधारणा झाली होती. १२ फेब्रुवारी रोजी साखरेचे दर ३२०० रुपये क्विंटलवर होते. मात्र, महिन्याभरातच या दरात घसरण होत काल १५ मार्चला हे दर ३०० रुपयांनी खाली येत २९०० रुपयांवर आले. मागच्या वेळी साखर दर खाली आल्याने काही कारखान्यांनी तर जाहीर केलेल्या ऊसदरातही कपात करण्यास सुरुवात केल्याने साखर उद्योगात चिंतेचे वातावरण आहे. सगळेच साखर कारखाने उसाचा भाव कमी करतात की काय, अशी धास्ती ऊसउत्पापदकांनी घेतली आहे.नोव्हेंबर २०१७मध्ये बाजारातील साखरेचे दर ३ हजार ६०० रुपये क्विंटलवरून जानेवारीत २ हजार ९०० रुपये क्विंटलपर्यंत घसरले होते. त्यामुळे राज्यातील साखर कारखाने पुन्हा एकदा शॉर्ट मार्जिनमध्ये जातात की काय, अशी भीती जाणकारांनी व्यक्त केली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचे उत्पादन ३० टक्क्यांनी वाढले आहेत. साखर कारखानदारी सुरू झाल्यापासून साखरेचे दर क्विंटलमागे तब्बल ६०० रुपयांनी खाली आल्याने राज्य बँकेनेही साखरेचे मूल्यांकन ४०० रुपयांनी कमी केले आहे. त्यामुळे ऊसउत्पादकांना एफआरपी देण्यासाठी कारखान्यांना आर्थिक जुळवाजुळव करावी लागण्याची चिन्हे आहेत. साखर कारखाने सुरु होताना साखरेला ३ हजार ६००च्या आसपास दर होते. त्यामुळे राज्य बँक साखरेचेही चांगले मूल्यांकन करत होती. मात्र, गेल्या तीन महिन्यांत साखरेचे दर तब्बल ६०० रुपयांनी खाली आले आहेत. त्यामुळे बँकेनेही साखरेचे मूल्यांकन क्विंटलमागे ४०० रुपयांनी कमी केले. राज्यात उसाचे क्षेत्र वाढल्याने साखरेचेही बंपर उत्पादन होणार असल्याची चिन्हे दिसू लागल्याने साखरेचे दर उतरले असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. सध्या राज्य बँक साखर कारखान्याना एका क्विंटल साखरेवर ८५ टक्के प्रमाणे २ हजार ६३५ रुपये उचल देत आहे. यामधून टनामागे ७५० रुपये उत्पादन खर्च वजा केला असता ऊसउत्पादकांना एफआरपी देण्यासाठी कारखानदारांच्या हातात केवळ १ हजार ८८५ रुपये उरत आहेत. तर दुरीकडे यावर्षीची एफआरपी २ हजार ६४२ रुपयांच्या आसपास असल्याने ऊसउत्पादकांना देवायची रक्कम व उत्पादन खर्च वजा जाता कारखानदारांच्या हातात उरणारी रक्कम याचा हिशेब केला असता एफआरपी भागविण्यासाठी कारखानदारांना ७५७ रुपये कमी पडत असल्याने ऊसउत्पादकांची एफआरपी कशी भागावणार? या चिंतेत कारखानदार सापडेल आहेत.सध्या साखर हंगाम सुरू आहे त्यामुळे बँकेचे मूल्यांकन कमी असूनही कारखानदारांनी पदरचे ७५७ रुपये टाकून २ हजार ६४२ रुपये एफआरपी सभासदांना अदा केली आहे. मात्र यासाठी कारखानदारांना इतर खर्चात काटकसर करत एफआरपी भागवावी लागली आहे.