शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
2
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
3
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
7
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
8
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
9
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
10
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
11
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
12
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
13
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
14
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
15
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
16
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
17
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
18
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
19
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
20
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण

साखरेच्या दरात घसरण सुरूच

By admin | Updated: February 28, 2015 23:38 IST

कच्च्या साखरेच्या निर्यातीवर अनुदानाची घोषणा झाल्यानंतरही साखर उद्योग क्षेत्रावरील मळभ दूर होण्याची चिन्हे नाहीत.

पुणे : कच्च्या साखरेच्या निर्यातीवर अनुदानाची घोषणा झाल्यानंतरही साखर उद्योग क्षेत्रावरील मळभ दूर होण्याची चिन्हे नाहीत. साखरेच्या दरात घसरण सुरूच असून शुक्रवारी कारखान्यातील साखरेचा दर (कर वगळता) प्रतिक्विंटल २,३१० ते २,३५० रुपयांपर्यंत खाली आला. अनुदानाची घोषणा झाली तेव्हा साखरेचा दर २,४०० ते २,४५० रुपये होता. मागील आठवड्यात कच्च्या साखरेच्या निर्यातीवर केंद्र सरकारने प्रतिटन ४,००० रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. मात्र, ही घोषणा अद्याप कागदावरच आहे. त्याबाबत अधिसूचना जारी न झाल्यामुळे साखर कारखानदारांनी कच्च्या साखरेचे उत्पादन सुरू केलेले नाही. दरम्यान, साखरेचे दर मागील ९ महिन्यांत तब्बल ७०० रुपयांनी घटले आहेत. मागील आठवड्यात कच्च्या साखरेच्या निर्यातीवर अनुदानाची घोषणा झाल्यानंतरही एनसीडीएक्स वायदे बाजारात घसरण सुरूच आहे. वायदे बाजारातील दर क्विंटलमागे १४२ रुपये कमी होऊन तो २,५५८ रुपयांवर आला आहे. मागील आठवड्यात हा दर २,७०० रुपये इतका होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या साखरेच्या दरामध्येही लक्षणीय घसरण झाली. मागील आठवड्यात प्रतिक्विंटल २,०४० रुपये असलेला हा दर आता १,८९० रुपयांपर्यंत खाली आला आहे.‘‘देशातील अनेक राज्यांमध्ये सार्वजनिक वितरणासाठी खासगी पुरवठादारांमार्फत साखर खरेदी केली जाते. ही खरेदी बाजारदरापेक्षा जास्त किमतीने होते. आधी राज्य सरकारसोबत साखर विक्रीचे करार करायचे आणि नंतर कारखान्यांकडून कमी दरात खरेदी करायची, असे सत्र सध्या सुरू आहे. यामुळे खासगी पुरवठादारांचे उखळ पांढरे होत आहे. देशातील साखर उद्योग संकटात येण्यामागे हेही एक महत्वाचे कारण आहे. अतिरिक्त साखरेचा बफर स्टॉक निर्माण केल्यास किंवा देशातील सार्वजनिक वितरणासाठी वार्षिक २७ लाख टन साखर सरकारने थेट कारखान्यांकडून खरेदी केल्यास या समस्येवर तोडगा निघू शकतो, असे मत अभ्यासक योगेश पांडे यांनी व्यक्त केले.४साखरेच्या दरातील घसरण न थांबल्यास कारखाने आणखी संकटात येण्याची दाट शक्यता आहे. कारखान्यांनी साखरेचे उत्पादन केल्यावर त्याच्या किमतीच्या आधारे बँका कारखान्यांना आगाऊ कर्ज देतात. या रकमेच्या आधारे कारखान्याकडून शेतकऱ्यांना उसाची किंमत आदा केली जाते. साखरेचे दर आणखी कमी झाल्यास, महिनाअखेर होणाऱ्या फेरआढाव्यात कर्जाचे पुनर्मुल्यांकन होईल आणि त्यातील फरक कारखान्यांकडून वसूल केला जाईल. आधीच संकटात असलेले कारखाने यामुळे अधिक संकटात येतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.