शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोडणी मजुरांना अतिसार

By admin | Updated: December 1, 2015 03:33 IST

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोडणी मजुरांना पिण्याचे दूषित पाणी प्यायल्याने रविवारी सायंकाळनंतर जुलाब-उलट्यांचा त्रास सुरू झाला

अवसरी : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोडणी मजुरांना पिण्याचे दूषित पाणी प्यायल्याने रविवारी सायंकाळनंतर जुलाब-उलट्यांचा त्रास सुरू झाला. २५ मजुरांवर पारगाव व मंचर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करून औषधोपचार सुरू करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे ५०० मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचा दावा वैद्यकीय सूत्रांनी केला आहे.आंबेगाव तालुक्यातील या कारखान्याच्या परिसरात ऊसतोडणी मजुरांची तात्पुरती वस्ती आहे. सध्या हंगाम सुरू असल्याने पाचशे ते सहाशे कामगार या भागात सहकुटुंब आहेत. जवळूनच वाहणाऱ्या घोड नदीचे पाणी पाईपलाईनने आणून व तेथे असलेल्या बोअरवेलचे पाणी हे मजूर वापरतात. कारखान्याच्या परिसरात घाण असते. अवकाळी पावसाचे घाण पाणी बोअरमध्ये झिरपून मजुरांना त्रास झाला असावा, असा अंदाज आहे. काल सायंकाळी पाचनंतर काही ऊसतोडणी मजुरांना जुलाब-उलट्या होऊ लागल्या. त्रास होणाऱ्यांची संख्या वाढत गेली. ही माहिती समजल्यावर कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तातडीने धामणी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मंचर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथक बोलावले.दिवसभर उलट्या-जुलाब झालेल्या मजुरांपैकी ज्यांची स्थिती गंभीर होती, त्यांना अ‍ॅम्ब्युलन्सने धामणी व मंचर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, सलाईन लावून प्रतिबंधात्मक औषधे देण्यात आली. काही जणांना घरी सोडण्यात आले. कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, संचालक प्रदीप वळसे-पाटील यांनी बहुतांश मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय घेतला. कारखाना परिसरातील वस्तीत जाऊन सर्वच मजुरांना प्रतिबंधात्मक गोळ्या व औषधे देण्यात आली. मंचर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ऊसतोडणी मजुरांवर वैद्यकीय उपचार चालू आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी भेट देऊन मजुरांच्या प्रकृतीची चौकशी केली. दरम्यान, मोठ्या प्रमाणात दुर्घटना होऊनही या घटनेची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली; त्यामुळे रुग्णांची नावे समजू शकली नाहीत. (वार्ताहर)शुद्धीकरण प्रकल्प सुरू करूपिण्याचे पाणी दूषित प्यायल्यामुळे जुलाब-उलट्या झाल्या आहेत. ऊसतोडणी मजूर आणि ग्रामस्थ, ऊसउत्पादक शेतकरी यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी कारखान्याने सुमारे २० ते २२ लाख रुपये खर्च करून शुद्धीकरण यंत्रणा उभारली आहे. परंतु, काही तांत्रिक अडचणीमुळे प्रकल्प कार्यान्वित केलेला नव्हता. येत्या दोन दिवसांत पाणी शुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित केला जाईल, अशी माहिती बेंडे, वळसे-पाटील यांनी दिली.