शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सुनेत्रा आणि पार्थ पवार यांच्या सुप्रिया सुळे देणेकरी, ५५ लाखांचे कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 00:27 IST

५५ लाख रुपये घेतले उसने : तब्बल १४२ कोटी रुपयांच्या संपत्तीच्या मालकीण

पुणे : तब्बल १४२ कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या वहिनी व भाच्यांकडून तब्बल ५५ लाख रुपये उसने घेतले आहेत. निवडणूक अर्ज दाखल करताना सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात सुळे यांनी ही माहिती दिली आहे.बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार सुप्रिया सुळे या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या आहेत. अजित पवार यांच्या चुलत बहिण आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांच्याकडून २२ लाख रुपये आणि पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडून ३५ लाख रुपये उसने घेतले आहेत. कोणत्याही बॅँकेचे कर्ज सुप्रिया सुळे यांनी घेतलेले नाही. २०१३-१४ या आर्थिक वर्षात सुळे यांनी १ कोटी १४ लाख, २०१४-१५ मध्ये ७१लाख १४ हजार, २०१५-१६ मध्ये ९० लाख ५४ हजार, २०१६-१७ मध्ये २ कोटी ४० लाख आणि २०१७-१८ मध्ये १ कोटी २९ लाख रुपये वार्षिक उत्पन्न दाखविले आहे.

पार्थ पवार हे वाणिज्य शाखेचे पदवीधर असून त्यांनी इंगल्ंडमधून कायद्याची पदवी मिळाविली आहे. सध्या कुटुंबाचा व्यवसाय सांभाळत आहेत. अमीको अ‍ॅग्री कमोडीटीस, एफपी रिअ‍ॅल्टिी प्रा. लि., भैरवनाथ कन्सल्टन्सी, अ‍ॅवा ग्लोबल लॉजीस्टिक्स, सु तारा अ‍ॅग्रो प्रा. लि., रेवती बिल्डकॉन या कंपन्यांवर ते संचालक म्हणून काम करतात. सुनेत्रा पवार या बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्ष आणि विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने उमेदवारांकडून अर्ज दाखल करताना त्यांनी आपल्या वैयक्तिक माहितीबरोबरच कुटुंबाच्या संपत्तीची माहिती देणे बंधनकारक केले आहे. अर्जाचे स्वरूप पदलेले असल्यामुळे आर्थिक बाबींची सखोल माहिती भरून घेतली जात आहे. त्यात उमेदवारावर किती कर्ज आहे किंवा इतर कोणाकडून घेतलेली रक्कम तो देणेकरी आहे का? याबाबतची माहिती विचारली आहे.कर्ज असतानाही दाखविले नाहीविशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांनी २०१४ मध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नसल्याचे दाखविले होते. त्यामुळे २०१४ नंतरच त्यांनी सुनेत्रा आणि पार्थ यांच्याकडून कर्ज घेतले असल्याचेही स्पष्ट होते.२०१४ मध्ये अजित पवार यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ३८ कोटी रुपयांची संपत्ती आणि १२ कोटी रुपयांचे कर्ज दाखविले होते. २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये अजित पवार यांनी आपले उत्पन्न १ कोटी ३६ लाख रुपये आणि पत्नी सुनेत्रा यांचे उत्पन्न ५२ लाख ५८ हजार रुपये दाखविले होते.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळे