शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

तोफा गडावर चढविण्यात शिवप्रेमी संघटनांना यश

By admin | Updated: January 11, 2017 02:53 IST

लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी पडलेल्या तोफा गडावर घेऊन जाण्यात मावळ तालुक्यातील शिवप्रेमी संघटनांच्या शिलेदारांना यश आले.

लोणावळा : लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी पडलेल्या तोफा गडावर घेऊन जाण्यात मावळ तालुक्यातील शिवप्रेमी संघटनांच्या शिलेदारांना यश आले. रविवार व सोमवार दोन दिवस विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत लोहगडाच्या पायथ्याजवळ पडलेल्या ३ तोफा गडावर चढविल्या. यापूर्वी ३ तोफा गडावर चढविण्यात आल्या आहेत.छत्रपती शिवरायांच्या पावनस्पर्शाने पुनीत झालेल्या मावळ प्रांतातील गड-किल्ले हे मराठ्याच्या इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभे आहेत. या गड-किल्ल्यांचे संवर्धन  व रक्षण करण्यासाठी विविध  शिवप्रेमी संघटना कार्य करत  आहेत. मागील काही दिवसांपासून गड संवर्धनाचे काम करणारी दुर्गविजय मावळ यांना लोहगडाच्या पायथ्याजवळ तीन तोफा मिळून आल्या होत्या. रविवारी व सोमवारी दुर्गविजय मावळ, सह्याद्रीचे शिलेदार, मावळ अँडव्हेंचर टीम, अनुशासन गडकिल्ले सुरक्षादल, श्री शिवशंभू प्रतिष्ठान, सह्याद्री प्रतिष्ठान व मावळ प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थांनी सदर तोफा गडावर चढविल्या. भारतीय पुरातत्त्व विभागाने परवानगी दिल्यास दोन्ही गडावर सुरक्षिततेच्या दृष्टीने कामे करण्याचा मानस या वेळी दुर्गप्रेमी व शिवप्रेमी संघटनांनी व्यक्त केली. तसेच गड-किल्ले परिसरात येणाऱ्या पर्यटकांनी गड-किल्ल्यांचे पावित्र्य जपत किल्ले परिसरात स्वच्छता राखावी, असे आवाहन करण्यात आले  आहे. मावळ तालुक्यातील किल्ले सुरक्षित राहावेत, यासाठी सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचे काम  करण्याची तयारी त्यांनी दशिर्विली आहे. (वार्ताहर)