वरिष्ठ माती विभाग वजन गट :
प्रथम क्रमांक
अजित लिंबोरे (५७ किलो), ऋतिक पोळेकर (६१ किलो),ऋषिकेश सुतार,६५ किलो,सूरज गुंड (७४किलो),ऋषिकेश उणेसा (८६ किलो)
गादी विभाग प्रथम क्रमांक
प्रज्वल गोळे (६५ किलो), हितेश ववले (७० किलो),ऋषिकेश गायकवाड (७९ किलो)
द्वितीय क्रमांक
सूरज मोहोळ (७०किलो), आकाश कुदळे (७४ किलो )
या मल्लांनी आपल्या वजनी गटात बाजी मारत यश संपादन केल्याने त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विजेत्या मल्लांना उरवडे गावचे माजी उपसरपंच व राष्ट्रीय खेळाडू पै.नरेंद्र मारणे,रामदास पोळेकर,सतीश ववले,अमित पिंगळे,बजरंग मारणे,विवेक आवाळे,नीलेश मारणे तसेच वस्ताद देवदास मारणे यांनी बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे
"नरेंद्र कुस्ती क्लबचे विजेते मल्ल पुणे जिल्हा आणि राज्यातही उत्कृष्ट कामगिरी करून मुळशी तालुक्याचा दबदबा निर्माण करतील" अशा भावना पै.नरेंद्र मारणे यावेळी व्यक्त केल्या.
विजेत्या मल्लांचा संकुलामध्ये सन्मान करण्यात आला.