शहरं
Join us  
Trending Stories
1
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
4
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
5
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
6
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
7
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
8
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
9
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
10
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
11
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
12
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
13
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
14
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
15
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
17
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
18
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
19
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
20
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीवर गुन्हा दाखल करा; शहर स्वच्छतेच्या मानांकनावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 04:46 IST

दारे-खिडक्या तुडलेल्या... पाण्याची सोय नाही... प्रचंड अस्वच्छता... असह्य दुर्गंधी अशी स्थिती बाजार समितीच्या आवारातील स्वच्छतागृहाची झाली आहे. यामुळे येथील कामगार व येणा-या ग्राहकांची प्रचंड गैरसोय होत असून, आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत बाजार समितीला वारंवार सांगूनदेखील यामध्ये दुरुस्ती झालेली नाही.

पुणे : दारे-खिडक्या तुडलेल्या... पाण्याची सोय नाही... प्रचंड अस्वच्छता... असह्य दुर्गंधी अशी स्थिती बाजार समितीच्या आवारातील स्वच्छतागृहाची झाली आहे. यामुळे येथील कामगार व येणाºया ग्राहकांची प्रचंड गैरसोय होत असून, आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत बाजार समितीला वारंवार सांगूनदेखील यामध्ये दुरुस्ती झालेली नाही. केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणातील पुणे शहर स्वच्छता मानांकनावर मोठा परिणाम होत असून, बाजार समितीवर तातडीने गुन्हा दाखल करा, असे थेट आदेशच महापौर मुक्ता टिळक यांनी महापालिका प्रशासनाल दिले आहेत.गुलटेकडी येथील मार्केट यार्डमध्ये प्रामुख्याने भाजीपाला व फळ बाजारामध्ये असलेल्या स्वच्छतागृहांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कचरा वेळेवर स्वच्छ न केल्याने येथे देखील प्रचंड दुर्गंधी येत असते. रस्त्यांच्या कडेला बसलेले किरकोळ विके्रतेदेखील प्रचंड घाण करत असल्याने परिसरात नेहमीच कचºयाचे साम्राज्य असते. याबाबत आडते असोसिएशनच्या वतीने वेळोवेळी निवेदने देण्यात आली आहेत.महापालिकेकडे तक्रारीनंतर महापौरांचे आदेशफुलबाजार, फळे व भाजीपाला बाजारात एकूण १३ ते १४ स्वच्छतागृहे आहेत़ त्यातील ७ ते ८ स्वच्छतागृहांचा ठेका हा ठेकेदारांना दिला आहे. मात्र सर्वच स्वच्छतागृहांमध्ये अपुºया सोयी व दुरवस्था झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर बाजार समिती केवळ बघ्याचीच भूमिका घेणार का? असा सवालही कामगार युनियनचे कुडले आणि नांगरे यांनी उपस्थित केला होता. बाजार समितीकडे १३० स्वच्छता कर्मचारी आहेत, त्यातील ६० कायमस्वरूपी आहेत, तर ७० कर्मचारी हे ठेकेदारी आणि रोजंदारीवर असतानादेखील ही दुरवस्था नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक आहे. याबाबत महापालिकेकडेदेखील नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. स्वच्छतागृहे व लगतचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी वेळोवेळी कळवूनदेखील काहीच कार्यवाही होत नसल्याने अखेर बाजार समितीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असल्याचे मुक्ता टिळक यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Puneपुणे