शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

टमटम चालकाची एसटी बसच्या चालकाला मारहाण; इंदापूर एसटी बसस्थानकाच्या आवारातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 15:33 IST

इंदापूर, दि. 26- इंदापूर एसटी बसस्थानकाच्या आवारात एका टमटम चालकाने एसटी बसच्या चालकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे.  इंदापूर एसटी बसस्थानकाच्या आवारात एसटी बसला आडवी लावण्यात आलेली बेकायदा प्रवासी वाहतूक करणारी टमटम बाजुला घेण्यास सांगितल्याने राग येवून टमटम चालकाने एसटी बसच्या चालकाला मारहाण केल्याची घटना शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बस स्थानकाच्या ...

ठळक मुद्देइंदापूर एसटी बसस्थानकाच्या आवारात एका टमटम चालकाने एसटी बसच्या चालकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. इंदापूर  बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ  बेकायदा प्रवासी वाहतूक करणारी टमटम (क्र.एमएच ४२ एम- ४१७१) आडवी लावण्यात आली होती.

इंदापूर, दि. 26- इंदापूर एसटी बसस्थानकाच्या आवारात एका टमटम चालकाने एसटी बसच्या चालकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे.  इंदापूर एसटी बसस्थानकाच्या आवारात एसटी बसला आडवी लावण्यात आलेली बेकायदा प्रवासी वाहतूक करणारी टमटम बाजुला घेण्यास सांगितल्याने राग येवून टमटम चालकाने एसटी बसच्या चालकाला मारहाण केल्याची घटना शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बस स्थानकाच्या आवारात घडली. एल.एस.लोमटे असे एसटी बस चालकाचे नाव आहे. इंदापूर आगारात तो कार्यरत आहे. इंदापूर- बारामती अशी प्रवासी वाहतूक करणारी एसटी बस (क्र.एम एच १४ बी टी २८६६) घेवून तो इंदापूरला येत होता.

इंदापूर  बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ  बेकायदा प्रवासी वाहतूक करणारी टमटम (क्र.एमएच ४२ एम- ४१७१) आडवी लावण्यात आली होती. तिला एसटी घासेल, म्हणून लोमटे यांनी टमटम चालक राजेंद्र चोरमले    ( रा.शिरसोडी, ता.इंदापूर) यास ती बाजुला घेण्यास सांगितले .या कारणावरुन राग येवून चोरमले याने वाद घालत लोमटे यांना मारहाण केली. चोरमले यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.परस्परांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचे काम चालू आहे.