शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

दक्षिणी मराठी लोकांशी विद्यार्थ्यांचा संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 00:50 IST

खेड तालुक्यातील भाम परिसरात असलेल्या जांभुळदरा शाळेत ‘दक्षिणी मराठी’ तसेच मायबोली मराठी व मराठी शाळेच्या प्रसार व प्रचारासाठी ‘प्रवास तंजावर मराठी’चा हा एक वेगळा उपक्रम सुरू आहे.

वाकी बुद्रुक - खेड तालुक्यातील भाम परिसरात असलेल्या जांभुळदरा शाळेत ‘दक्षिणी मराठी’ तसेच मायबोली मराठी व मराठी शाळेच्या प्रसार व प्रचारासाठी ‘प्रवास तंजावर मराठी’चा हा एक वेगळा उपक्रम सुरू आहे. आठवड्यातील प्रत्येक शनिवारी सकाळी शाळेतील एका वर्गात गुगल हँग आऊट या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चेन्नई, तमिळनाडू येथे कायमस्वरुपी वास्तव्यास असलेल्या मराठी भाषिकांशी संवाद साधतात.विद्यार्र्थी कॅमेऱ्याद्वारेच प्रश्न विचारत होते. इ. ४ थीच्या परिसर अभ्यास विषयातील शिवछत्रपतींचा इतिहास त्यांना माहीत होता. मात्र, त्यांचे वंशज व्यंकोजीमहाराज व महाराष्ट्राच्या बाहेरही मराठी भाषिक बहुसंख्येने आहेत हे ऐकून, त्यांच्याशी बोलून आश्चर्य, तसेच अभिमानाची भावना विद्यार्थ्यांमध्ये दिसत होती. मराठी भाषेतील गमतीजमती मुलांनी अनुभवल्या.तमिळनाडू, चेन्नई या भारताच्या दक्षिण भागात तंजावर मराठा साम्राज्याची स्थापना केली. कालांतराने तेथील मराठी भाषिक व्यक्तींवर तमिळ भाषेचा परिणाम झाला. तमिळ व मराठी या दोन्ही भाषामिश्रित तंजावर मराठी नावाची एक नवीच बोलीभाषा निर्माण झाली. १८५५ मध्ये तंजावूर मराठा साम्राज्य संपून गेल्यानंतर तंजावूर मराठी भाषिक नोकरी, व्यवसायाकरिता, शिक्षणाकरिता तमिळनाडू, पुदुचेरी, केरळ, कर्नाटक, आंध्र, तेलंगणात गेले. स्थलांतरासोबत मराठी भाषा व मराठी संस्कारही स्थलांतर झाले. म्हणजेच विसाव्या शतकात या तंजावूर मराठी भाषेवर तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड भाषेचा व्याकरणदृष्ट्या परिणाम झाला. परंतु साडेतीनशे वर्षांनंतरही मराठीपण विसरले नाहीत. आम्ही महाराष्ट्रीयन मराठी असे तेथील मराठी भाषिक अभिमानाने सांगतात.दक्षिणी तंजावूर मराठी भाषिक लोक व शाळेतील शिक्षक-विद्यार्थी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आहेत. शनिवारी शाळेतील मुले त्यांना महाराष्ट्रीयन मराठी शिकवतात.मराठी भाषेतील म्हणी, समान उच्चाराचे शब्द, यातून होणाºया गमतीजमती जवळून अनुभवतात. या आॅनलाईन चर्चेत शाळेतील विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक राजेंद्र रावळ, देवकी पाटील, राजश्री शिंदे, तारा लोहकरे, नीलम धावडे, तंत्रस्नेही शिक्षक नागनाथ विभूते सहभागी झाले होते. आॅस्ट्रेलियाच्या वेस्टमेडमधील ६६ विद्यार्थीसंख्या असलेल्या आॅस्ट्रेलियन मराठी शाळेशी आॅनलाईन संवाद घडवून आणला होता.मानसी केळकर या उपक्रमात मदत करत आहेत. इंग्रजी शाळांकडे आकर्षित होणाºया सध्याच्या युगात मराठी भाषा व मराठीपण जपण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून स्वत:ची इमारत नसलेल्या जिल्हा परिषद शाळांत सुरू असलेला हा उपक्रम नक्कीच मराठी भाषा व मराठी संस्कृतीचे जतन करण्यासाठीचे पुढचे पाऊल समजायला हरकत नाही.

टॅग्स :Puneपुणेmarathiमराठी