शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळ्यातून केले समाजप्रबोधन

By admin | Updated: June 25, 2017 04:36 IST

विठ्ठल विठ्ठल... विठ्ठला हरी ओम विठ्ठला, ज्ञानोबा तुकाराम व विठ्ठलनामाच्या जयघोषात, टाळ-मृदंगाच्या गजरात, लेझीम व ढोल ताशा पथकासह राजेगाव

लोकमत न्यूज नेटवर्कराजेगाव : विठ्ठल विठ्ठल... विठ्ठला हरी ओम विठ्ठला, ज्ञानोबा तुकाराम व विठ्ठलनामाच्या जयघोषात, टाळ-मृदंगाच्या गजरात, लेझीम व ढोल ताशा पथकासह राजेगाव (ता. दौंड) येथील राजनाथ इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात दिंडी काढली. या वेळी विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून वृक्षतोड, स्री-भ्रूणहत्या, शेतकरी आत्महत्या या विषयांवर प्रबोधन केले.संस्थेचे अध्यक्ष नवनाथ काळे आणि सचिव चंद्रकांत लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका मनाली दळवी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या वेळी राजनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल खैरे, गावातील ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षक शहाजी मोघे, अमृता मांडे, अलिशा शेख, प्रमोद खंडागळे, राजेंद्र जाधव, रूपाली चोपडे, ललिता कदम, स्नेहल राक्षे, सोनाली लोंढे, शैलेंद्र वाघमारे यांनी दिंडी सोहळा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.दिंडीत विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत व विद्यार्थिनी डोक्यावर तुळस घेऊन सहभागी झाल्या होत्या. भगवे ध्वज, टाळ हातात घेऊन बालवारकऱ्यांनी विठ्ठलनामाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला. विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, छत्रपती शिवाजीमहाराज, मुक्ताबाई व संत तुकारामांच्या वेशभूषा परिधान केलेले लहान विद्यार्थी दिंडीचे आकर्षण ठरले. विद्यार्थिनी व शिक्षिकांनी फुगड्यांचा आनंद लुटला.दिंडीमध्ये झाडांचे रोप घेऊन सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण व संवर्धनाचा संदेश दिला. गणपतीच्या मंदिरासमोर विद्यार्थ्यांनी केलेल्या रिंगण सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. राजनाथ इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका मनाली दळवी यांच्या हस्ते पालखीच्या पूजनाने दिंडीस प्रारंभ करण्यात आला. दिंडीतील पालखीचे चौका-चौकात स्वागत करण्यात आले. लहान मुलांची दिंडी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.राजनाथ इंग्लिश स्कूल, तुकाराम मंदिर, राजेश्वर मंदिर, गणपती मंदिर येथून मार्गक्रमण करत शाळेच्या आवारात दिंडीचा समारोप झाला.