शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
2
Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?
3
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
4
भयंकर! २५ हजारांच्या कर्जासाठी मुलगा ठेवला गहाण, मिळाला मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना
5
VIDEO: थोडक्यात वाचली जिनिलिया, कारमध्ये बसत असताना ड्रायव्हरकडून नकळत झाली चूक अन्...
6
कोर्टातून पळून गेलेला आरोपी मनसेच्या कार्यालयात पोहोचला! नेत्याला दिली धमकी, मुंबईत घडली धक्कादायक घटना 
7
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
8
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
9
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
10
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
11
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
12
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
13
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
14
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
15
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
16
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
18
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
19
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
20
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा

प्रॉक्टर्ड परीक्षेची विद्यार्थ्यांना धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे मंगळवारपासून (दि.८) प्रथम वर्ष ते अंतिम पूर्व वर्षाच्या विद्यार्थ्यांची प्रॉक्टर्ड ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे मंगळवारपासून (दि.८) प्रथम वर्ष ते अंतिम पूर्व वर्षाच्या विद्यार्थ्यांची प्रॉक्टर्ड पध्दतीने परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी धास्ती घेतली आहे. परंतु, विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये. परीक्षेतील सजगतेसाठी विद्यापीठाने ‘प्रॉक्टर्ड’चा पर्याय स्वीकारला आहे, असे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.

विविध शैक्षणिक संस्थांकडून व प्रवेश पूर्व परीक्षांसाठी प्रॉक्टर्ड पध्दतीचा वापर केला जातो. त्यात व्हिडिओ प्रॉक्टर्ड, इमेज प्रॉक्टर्ड आणि अ‍ॅक्टिव्हिटी प्रॉक्टर्ड परीक्षा घेतल्या जातात. विद्यापीठातर्फे केवळ इमेज पॉक्टर्ड पध्दतीचा अवलंब केला जाणार आहे. त्यात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला फ्रंट कॅमेरा असलेले इलेक्टॉनिक उपकरण आवश्यक आहे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याच्या कॅमेराला एकच विद्यार्थी दिसणे अपेक्षित आहे. ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याच्या कॅमेरा समोर एका पेक्षा जास्त व्यक्ती अल्यास सॉफ्टवेअरकडून फोटो काढून घेतले जातात. तसेच एक ते दोन मिनिटांनी फोटो काढून घेतले जात असल्याने परीक्षेचे गांभीर्य वाढणार आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार आढळून आल्यास संबंधित विद्यार्थ्यावर कारवाई केली जाणार असल्याचे विद्यापीठाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

---

व्हिडिओ प्रॉक्टर्ड परीक्षेसाठी ब्रण्ड विर्डथ जास्त लागते. त्यामुळे व्हिडिओ प्रॉक्टर्ड परीक्षा घेणे सोपे नाही. या उलट इमेज प्रॉक्टर्ड परीक्षा घेणे सहज शक्य आहे. विद्यापीठाकडून आता परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याच्या हालचाली टिपल्या जाणार आहेत. परिणामी विद्यापीठाला परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराचे पुरावे जमा करता येतील. अ‍ॅक्टोव्हिटी प्रॉक्टर्ड मध्ये विद्यार्थी परीक्षा देताना मोबाईल, लॅपटॉप किंवा संगणकावर परीक्षे ऐवजी इतर कोणती विण्डो ओपन करतो का? हे तपासले जाते.

--

सजगतेच्या दृष्टीकोनातून विद्यापीठाने प्रॉक्टर्ड पध्दतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. एक ते दोन मिनिटांनी विद्यार्थ्यांचे फोटो काढले जातील. परंतु, योग्य मार्गाने परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये.

- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ