शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
3
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार
4
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
5
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
6
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
7
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
8
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
9
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
10
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
11
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
12
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
13
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
14
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
15
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
16
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
18
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
19
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
20
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या

विद्यार्थ्यांनी अनुभवले रात्रीच्या आसमंतातील तारांगण

By admin | Updated: December 31, 2016 05:24 IST

येथे आयोजित २४ व्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसमध्ये आज विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्सुकतेने प्रदर्शन व तेथे असलेल्या अनेक उपक्रमांचा आनंद लुटला.

बारामती : येथे आयोजित २४ व्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसमध्ये आज विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्सुकतेने प्रदर्शन व तेथे असलेल्या अनेक उपक्रमांचा आनंद लुटला. शुक्रवारी या प्रदर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती. विद्यार्थ्यांनी येथे रात्रीच्या आसमंताचा आभास निर्माण करून केलेले तारांगण अनुभवले. शिवाय भौतिकशास्त्र, गणित, खगोलशास्त्र, वन्यजीवन, विज्ञान, रोबोट आदी प्रदर्शनाचे आकर्षण ठरले.सकाळी नऊपासूनच विद्यार्थ्यांनी प्रदर्शन पाहण्यासाठी रांगा लावल्या होत्या. या प्रदर्शनातील फिल्म शोमध्ये दाखवल्या जाणाऱ्या विविध निसर्गविषयक, तसेच विज्ञानाशी संबंधित अनेक चित्रफिती पाहून मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. भव्य पडद्यावर वन्यजीव व विज्ञानाशी संबंधित या चित्रफिती अनेक मुलांनी प्रथमच पाहिल्या.या शिवाय तारांगणामध्ये मुलांना खगोलशास्त्राची सविस्तर माहिती दिली जात होती. एका काळ्या डोममध्ये विद्यार्थ्यांना नेऊन तेथे रात्रीच्या आसमंताचा आभास निर्माण केलेले तारांगण विद्यार्थ्यांनी अनुभवले. विविध ग्रह व ताऱ्यांसह खगोलशास्त्राबाबत या वेळी मुलांना अनेक नवीन गोष्टींची माहिती दिली गेली. मनोरंजनातून भौतिकशास्त्र व गणित यांचीही माहिती या प्रदर्शनादरम्यान विद्यार्थ्यांनी घेतली. विविध प्रकारच्या कृती कशा करायच्या, हेही या वेळी मुलांना सांगितले जात होते. विद्या प्रतिष्ठान सी.बी.एस.ई. शाळेच्या वतीने मुलांना रोबोटीक्सची माहिती देण्यात आली. मुलांनी बारामतीच्या प्रयोगशाळेत तयार केलेले रोबोटीक्स विविध कामे कशी करतात याचा अनुभव घेतला. याबाबत विद्यार्थ्यांकडून दिली जात असलेली माहिती पाहून मुले हरखून गेली. मुलांसह पालकांनीदेखील या उपक्रमाची प्रशंसा केली. अनेक पालक आपल्या मुलांना रोबोटीक्स दाखविण्यासाठी आवर्जून घेऊन आल्याचे आज दिसले. (वार्ताहर)मुलांनी साधला संवादविविध तालुक्यांतून आलेल्या मुलांनी आज या बाल विज्ञान काँग्रेससाठी परराज्यांतून आलेल्या मुलांशी विद्या प्रतिष्ठान संकुलात संवाद साधला. कोणत्या राज्यातून ते आले आहेत, कोणते प्रयोग त्यांनी सादर केलेले आहेत, त्यांना महाराष्ट्राविषयी काय वाटले, याबाबत मुलांनी त्यांच्याशी चर्चा केली. विद्या प्रतिष्ठानच्या संकुलात विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी होती. मात्र, उत्साही मुलांनी या मुलांशी या गर्दीतही संवाद साधला. थालिपीठ, बिर्याणीचा आस्वाद...विज्ञान प्रदर्शनात मुलांनी खाऊगल्लीतील खाद्यपदार्थांवर मनसोक्त ताव मारला. भेळ, पाणीपुरी, वडापाव, थालिपीठ, शाकाहारी बिर्याणी, ज्यूस व आइस्क्रीमचा आस्वाद मुलांनी घेतला. त्याच्या शेजारी असलेल्या जत्रेतही जात मुलांनी पाळणे व इतर खेळण्यात बसत त्याचाही आनंद मनमुराद लुटला. या प्रदर्शनाला भेट दिल्याचा वेगळाच आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होता. प्रत्यक्षात शस्त्रे पाहून हरखून गेली मुलेपुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने २४ व्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसमध्ये आयुध प्रदर्शन आयोजित केले गेले. या दालनात पोलिसांच्या वापरातील विविध प्रकारची शस्त्रे ठेवण्यात आलेली आहेत. इतर वेळी छायाचित्र, चित्रपटात पाहिलेली पोलिसांची शस्त्रे पाहून मुले हरखून गेली.