शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

सावरदरीच्या शाळेत विद्यार्थ्यांची सहकारी बँक

By admin | Updated: September 30, 2015 01:20 IST

एखाद्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेलाही लाजवेल, असा कायापालट खेड तालुक्यातील सावरदरी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेने घडवून आणला आहे.

आंबेठाण : एखाद्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेलाही लाजवेल, असा कायापालट खेड तालुक्यातील सावरदरी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेने घडवून आणला आहे. विशेष म्हणजे शाळेत विद्यार्थी व पालकांची सहकारी बँक सुरू केली आहे़ शिक्षक आणि ग्रामस्थ यांनी मिळून केलेल्या प्रयत्नांमुळे आता ‘आयएसओ’ मानांकनही प्राप्त झाला आहे. सावरदरी गाव सध्या जरी वाढत्या औद्योगिकीकरणामुळे जगाच्या नकाशावर असले, तरी काही वर्षांपूर्वी या गावात आपली मुलगी देण्यास बाहेरील गावचे लोक नकार देत. परंतु, बदलत्या काळाबरोबर आणि प्रखर कष्ट करण्याच्या मानसिकतेवर या गावातील लोकांनी भर दिला व आपले गावच नव्हे, तर शाळादेखील आदर्श बनविली. या शाळेत ८५ मुले आणि ९४ मुली, असे एकूण १८९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नुकतीच या शाळेची पाहणी करण्यात आली. आयएसओ मानांकनासाठी लावलेले सर्व निकष पूर्ण केल्याने सावरदरी शाळेची ‘आयएसओ ९००१:२००८’ साठी निवड करण्यात आली आहे. या शाळेत राबविलेल्या विविध उपक्रमांमध्ये शाळेची इमारत, संपूर्ण फर्निचरयुक्त ई-लर्निंग व संगणक कक्ष, गांडूळखत प्रकल्प, परसबाग, कम्पोस्ट खत प्रकल्प असे नानाविध प्रकल्प या शाळेने राबविले आहेत.कम्पोस्ट खत प्रकल्प राबवताना शाळेत दररोज जमा होणारा कचरा, मुलांचे उरणारे अन्न यांच्यापासून हे खत बनविले जात आहे. याशिवाय, शाळा परिसरात विविध औषधी वनस्पतींची लागवड केली आहे. त्यात निलगिरी, आवळा, तुळस, बेहडा, हिरडा, फणस या झाडांची लागवड केली असून, त्यांना नाव असणारे फलक लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पक्षी चारा प्रकल्प राबविण्यात आले असून त्यासाठी अन्नपाण्याची सोय करण्यात आली आहे. याशिवाय, त्यांच्या राहण्यासाठी सुगरणीचे खोपे, घरटी उभारण्यात आली आहेत. याशिवाय भित्तिचित्रे, नकाशे, प्रत्येक वर्गानुसार अभ्यासक्रमाची मांडणी, ऋतुचक्र, सुविचार, भूजलचक्र चित्रे दाखून शालेय व्हरांडा बोलका करण्यात आला आहे. (वार्ताहर)