शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
3
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
4
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
5
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
6
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
7
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
8
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
9
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
10
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
11
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
12
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
13
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
14
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
15
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
16
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
17
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
18
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
19
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
20
'या' कंपनीचा शेअर २३९० वरून ५९ रुपयांवर घसरला; सेबीने केलेली कारवाई, आता नवी माहिती समोर

विद्यार्थ्यांना हवे ‘आधार’

By admin | Updated: January 6, 2016 00:43 IST

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महापालिका शाळांच्या सर्व विद्यार्थ्यांचे आधारकार्डचे काम पूर्ण व्हायला हवे होते.

पिंपरी : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महापालिका शाळांच्या सर्व विद्यार्थ्यांचे आधारकार्डचे काम पूर्ण व्हायला हवे होते. मात्र, आधार चालकांच्या बेजबाबदारपणामुळे अद्यापही सात हजार विद्यार्थ्यांना आधारकार्ड मिळाले नाही. महापालिकेच्या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्याचे काम तीन महिन्यांपासून सुुरू होते. काही आधारचालकांनी प्रामाणिकपणे आधार काढण्याचे काम केले, तर काहींनी आधारचे काम करण्यास चालढकल केली. सध्या महापालिका विद्यार्थ्यांची संख्या ३९ हजार ८४५ आहे. त्यातील ३२ हजार ७४७ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढून झाले आहेत. अद्याप ७ हजार ९८ विद्यार्थ्यांना आधारकार्ड मिळालेले नाही. यातील काही विद्यार्थी गैरहजर आहेत. याचा पाठपुरावा शिक्षण मंडळाच्या पर्यवेक्षकांनी घेतला आहे. तशी उरलेल्या विद्यार्थ्यांची यादी शिक्षण विभागाकडे सादर केली आहे. आधारकार्ड काढण्याचे ८० टक्के काम शिक्षण प्रशासनाने पूर्ण केले आहे. सुरूवातीला आधार काढण्यासाठी ३० मशिन दिल्या होत्या. काही कालावधीने त्या कमी झाल्या. सध्या आधारकार्ड काढण्यासाठी नऊ मशिन सुरू होत्या. त्यातील तीन मशिन अंगणवाडीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. आधार मशिन अपुऱ्या असल्यामुळे आधारचे काम अपूर्ण राहिले आहे. पुणे आयुक्तालय यांच्याकडून आधार केंद्रचालकांना आदेश दिले होते की, दिवसाला सरासरी ७५ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढणे आवश्यक आहे. मात्र केंद्रचालकांनी ५० आधारकार्डही काढले नाहीत. केंद्रचालक प्रतिसाद देत नसल्याने, तसेच संवादाच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना आधारकार्डपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. उरलेल्या विद्यार्थ्यांचे पालक पैसे देऊन खासगी संस्थाचालकांकडून आधार काढत आहेत. याचा भुर्दंड पालकांना सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी)