पुणो : शिक्षण मंडळातील प्रशासनाच्या बेभरवशी कारभारामुळे शालेय साहित्य खरेदीचा वाद न्यायालयात होता. अखेर महापालिका न्यायालयाने वह्याखरेदीवरील स्थगिती उठविण्याचे आदेश आज दिले. त्यामुळे महापालिकेच्या शाळेतील गोरगरीब विद्याथ्र्याना वह्यांचे वाटप सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महापालिकेच्या शाळेतील विद्याथ्र्याना पहिल्या दिवशी गणवेश व शैक्षणिक साहित्य देण्याची घोषणा दरवर्षी केली जाते. त्यासाठी महापालिकेमार्फत शिक्षण मंडळाचा अर्थसंकल्प अगोदर तीन महिने (डिसेंबरअखेर) मंजूर केला जातो. 2क्14-15च्या अर्थसंकल्पात शालेय साहित्यासाठी 1 कोटी 6क् लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यामध्ये सर्वाधिक 1 लाख 15 हजार रुपयांची तरतूद वह्याखरेदीसाठी होती. साधारण जानेवारी ते मार्चअखेर साहित्य खरेदीची प्रक्रिया पूर्ण होऊन विद्याथ्र्याना शाळेच्या पहिल्या दिवशी शैक्षणिक साहित्य मिळण्याचे नियोजन असते.
मात्र, शिक्षण मंडळाच्या दिरंगाई कारभारामुळे जानेवारी महिन्यातील वह्याखरेदीची पहिली निविदा प्रक्रिया वादग्रस्त ठरली. ठेकेदारांच्या जादा दरावर स्वयंसेवी संस्थांनी आक्षेप घेतले. त्यामुळे तत्कालीन महापालिका आयुक्त विकास देशमुख यांनी ही निविदा प्रक्रिया रद्द केली.
दुस:यांदा निविदा प्रक्रिया मागविण्यात आली; मात्र त्यावर काही ठेकेदारांनी आक्षेप घेतले. अखेर आयुक्तांनी थेट उत्पादक कंपनीकडून वह्याखरेदीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे वह्यांची किंमत प्रत्येकी 27 रुपयांवरून थेट 15 रुपयांवर खाली आली. त्यामुळे महापालिकेचे तब्बल 4क् लाख रुपयांची बचत झाली
होती. त्यानुसार वह्याखरेदीचे ठराव मंजूर करण्यात आला. मात्र, त्यावर पुन्हा काही उत्पादक कंपनीने आपेक्ष घेऊन तक्रार दाखल केली होती. त्यामुळे शैक्षणिक साहित्य खरेदीला स्थगिती देण्यात आली होती. (प्रतिनिधी)
अखेर उच्च न्यायालयानंतर महापालिकेच्या न्यायालयाने ही खरेदीवरील स्थगिती उठविण्याचे आदेश आज दिले. त्यानंतर शिक्षण मंडळाचे प्रमुख बबन दहिफळे यांनी तातडीने गुरुवारीच संबंधित कंपनीला वह्यांच्या खरेदीचे आदेश दिले. त्यामुळे महापालिकेच्या सर्व प्राथमिक शाळांतील सुमारे 85 हजार विद्याथ्र्यांना आजपासून (शुक्रवारी) वह्यांचे वाटप सुरू होणार आहे, असे दहिफळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.