शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

विद्याथ्र्यानी घेतला स्वच्छता अभियानात सहभाग

By admin | Updated: November 15, 2014 00:02 IST

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूयांच्या जयंतीनिमित्त शहरातील संघटना, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

पुणो : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूयांच्या जयंतीनिमित्त शहरातील संघटना, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक उपक्रमांबरोबरच विविध शाळांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यात विद्याथ्र्यासह शिक्षकांनी सहभाग घेतला. 
 
4स्मिता पाटील विद्यालय, पुणो शहर काँग्रेस ज्येष्ठ नागरिक संघ, महाराष्ट्र प्रदेश युवक इंटक संघटना, पुणो शहर एन.एस.यू.आय. यांच्या वतीने नेहरूंना अभिवादन करण्यात आले.
4महाराष्ट्र प्रदेश युवक इंटक संघटनेतर्फे नेहरूंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. या  वेळी अॅड. राहुल म्हस्के, अण्णा ओव्हाळ, जयश्री यादव उपस्थित होते.
4स्मिता पाटील महाविद्यालयात बाल स्वच्छता मोहिमेचा उपक्रम घेण्यात आला. या वेळी शाळेचे क्रीडांगण व भोवतालचा परिसर विद्यार्थानी स्वच्छ केला. अनेक विद्यार्थी नेहरूंच्या वेशभूषेत आले होते. तसेच मुलांसाठी मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन केले होते. 
 
4आंबेगाव : येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये पालकांच्या व विद्याथ्र्याच्या विशेष सहभागासह बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. 
4अभिनवच्या वतीने या वर्षी सर्व विद्याथ्र्यासाठी शिक्षकांनी स्वत: बनवलेले विविध प्रकारचे बौद्धिक व शारीरिक खेळ ठेवले होते. हे सर्व खेळ खेळताना विजेत्या झालेल्या विद्याथ्र्याना बक्षिसेही देण्यात आली. 
4यामध्ये विद्याथ्र्याबरोबरच पालकांनीही सहभाग नोंदवला. अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वर्षा शर्मा यांच्या कल्पनेतून हा उपक्रम साकारला. 
 
वाघोलीत प्रभातफेरी
4वाघोली : खाऊचे वाटप आणि आनंदोत्सवात वाघोलीतील सर्वच शाळा, बालवाडय़ांमध्ये बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. बाईफ रस्त्यावरील बालवाडी आणि मिलेनियम स्कूलमध्ये ग्रामस्थांनी खाऊचे वाटप करीत विद्याथ्र्याना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. सातव विद्यालय, जिल्हा परिषद शाळेमध्येदेखील विद्याथ्र्याना खाऊचे वाटप करण्यात आले. गावामध्ये प्रभात फेरी काढून विद्याथ्र्यानी स्वच्छतेचे संदेशही दिले. 
 
चिमुकल्यांनी घेतली आकाशात भरारी
पुणो : आकाशात भरारी घेण्याची संधी चिमुकल्यांना बालदिनानिमित्त मिळाली. डायरेक्टर जनरल ऑफ सेंट्रल एव्हीएशन सेंटरतर्फे हा उपक्रम घेण्यात आला.
हडपसर येथील ग्लायडिंग सेंटरच्या मैदानात कात्रज येथील भिलारेवाडीतील जनसेवा फाउंडेशनच्या निराधार पुनर्वसन केंद्रातील 5क् अनाथ मुलींना विमानाची सफर घडवून आणण्यात आली. ग्लायडिंग सेंटरचे कॅप्टन शैलेश चारभे, लेफ्टनंट जनरल रंजन गोस्वामी, कॅप्टन डी.एस. गिल, विनायक लेले आदींनी विमान सफरीचा आनंद या मुलींना देऊन बालदिन साजरा केला. याप्रसंगी जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विनोद शहा, मीना शहा, महेंद्र पवार, चेतन पेठे, केशव तेलंगी आदी उपस्थित होते. 
 
महेश विद्यालयात अभियान
4पुणो : स्वच्छ सुंदर भारताचे आम्ही पाईक होऊ, अस्वच्छतेला आणि आळसाला छेद देऊ, या निर्मळ भावनेने महेश विद्यालय इंग्रजी माध्यमाने स्वच्छता अभियानाला प्रारंभ केला. मुख्याध्यापिका रोहिणी कुलहळ्ळी यांनी पंडित नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन करून विद्याथ्र्याना स्वच्छतेचे आणि अभियानाचे महत्त्व सांगितले. शाळेतील सर्व विद्याथ्र्यानी, मुख्याध्यापिका व शिक्षकवृंद यांच्या समवेत, पटांगण, वर्गखोल्या व व्हरांडा यांची स्वच्छता केली. 
एसएनबीपी विद्यालयात स्पर्धा
4येरवडा : सुभद्रा शिक्षण समूहाच्या एसएनबीपी विद्यालयामध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले.  विद्यालयाचे प्राचार्य विभाकर तेलोरे, उपप्राचार्या रेजिना रॉड्रिक्स, फिरोज शेख उपस्थित होते. बालदिनानिमित्त व्यंगचित्र काढणो, मातीच्या वस्तू तयार करणो, बाल स्वच्छता अभियान तसेच मुलांच्या मनातील कल्पनांना उजाळा देण्यासाठी चित्रकला व कार्यानुभव यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. कार्यक्रमात विद्याथ्र्यानी मोठय़ा उत्स्फूर्तपणो सहभाग घेतला. 
 
युवक कॉँग्रेसतर्फे 
शालेय साहित्याचे वाटप
4पुणो : बालदिन व लहुजी वस्ताद यांच्या जयंतीनिमित्त पुणो शहर युवक काँग्रेसतर्फे शालेय साहित्यवाटप करण्यात आले.  देशाचे भविष्य घडविण्याची ताकद व दृष्टी बालकांच्या अंगी यावी यासाठी युवकांनी काम करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चिटणीस सनी निम्हण यांनी केले. पुणो शहराध्यक्ष कैलास पवार यांनी आयोजन केले.  
4देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त व आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या 22क्व्या जयंतीनिमित्त मुलांना शालेय साहित्यवाटप केले. या प्रसंगी शिक्षण मंडळ सदस्य अमित मुरकुटे, विवेक बिराजदार, फय्याज शेख, गणोश खमितकर, अक्षय माने, विजय खळदकर, तेजस गडाळे उपस्थित होते. अनिकेत कपोते यांनी सूत्रसंचालन केले. प्रवीण डोंगरे यांनी आभार मानले.