किवळे : वडिलांनी सायकल घेऊन दिली नाही म्हणून निगडीत १२ वर्षांच्या मुलाने ओढणीच्या साह्याने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास किवळे येथे उघडकीस आली आहे. इशांत बलवीर शर्मा (वय १२, रा. श्रीधर सोसायटी, निगडी) असे गळफास घेतलेल्या मुलाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडील कामावर गेले होते. आई भाजी आणण्यासाठी बाहेर गेली होती. घरात कोणीही नव्हते. अशा वेळी इशांतने पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती चुलते पवन शर्मा यांना मिळाली. बेशुद्धावस्थेतील इशांतला त्यांनी तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
सायकल न मिळाल्याने आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 01:53 IST