शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
4
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
5
"ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
6
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
7
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
8
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
9
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
10
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
11
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
12
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
13
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
14
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
15
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
16
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
17
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
18
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
19
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
Daily Top 2Weekly Top 5

पाणी साचल्याने अडली वाहतूक

By admin | Updated: June 24, 2015 05:22 IST

सतत कोसळणारा पाऊस आणि सखल भागांत साचलेल्या पाण्यामुळे पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहनांचा वेग मंदावल्याने मंगळवारी शहरभरात

पिंपरी : सतत कोसळणारा पाऊस आणि सखल भागांत साचलेल्या पाण्यामुळे पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहनांचा वेग मंदावल्याने मंगळवारी शहरभरात अनेक भागांत वाहतूककोंडीचा सामना करण्याची वेळ शहरवासीयांवर आली. एकीकडे हैराण करणारा पाऊस आणि दुसरीकडे वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक पुरते हैराण झाले. वाहतूककोंडी सोडविण्यात पोलिसांची पुरती भंबेरी उडाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. सलग तिसऱ्या दिवशी शहरामध्ये संततधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रस्त्यावरून घसरण्याच्या भीतीपोटी वाहनचालक विशेषत: दुचाकी चालकांकडून वाहने सावकाश चालविण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातच बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवरून वाहणाऱ्या पाण्याखाली असणारे खड्डे, गटारांच्या खचलेल्या जाळ्या अशा ठिकाणी वाहने खड्ड्यांत आदळणे, काही वेळा ती अडकून पडण्याच्या लहान दुर्घटनांचा अनुभव चालकांना येत आहे. त्यामुळे वाहनांचे कोणतेही नुकसान होणे टाळण्यासाठी वाहनचालकांना सावकाशीने वाहने चालवावी लागत आहेत. सतत बरसणाऱ्या पावसामुळे शहरामधील मुख्य रस्त्यांसह अनेक लहान रस्त्यांवरील सखल भागांत पाणी साचले होते. परिणामी, या पाण्यातून दुचाकी काढण्याची कसरत चालकांना करावी लागत होती. प्लगला पाणी लागल्याने अथवा सायलेन्सरमध्ये पाणी शिरल्याने अनेक दुचाकी बंद पडल्याचे प्रकार अनेक भागांत पाहण्यास मिळाले. फूटभर साचलेल्या पाण्यातून मोटारी काढण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात त्या काही वेळ बंद पडल्याने पुढे ढकलून काढण्याची वेळ चालकांवर आल्याचे प्रकार ठिकठिकाणी घडले. या सर्वच प्रकारांमुळे वाहतूक व्यवस्थेवर सकाळपासूनच विपरीत परिणाम झाला. पिंपरीतील वर्दळीच्या मोरवाडी चौक, इंदिरा गांधी उड्डाणपुलाजवळच्या वैशालीनगर, नेहरुनगरच्या संतोषी माता चौक, पिंपरी कॅम्प, चिंचवडच्या ग्रेड सेपरेटर, चिंचवड गावठाण, निगडी, आकुर्डी, कासारवाडीतील शंकरवाडी भुयारी मार्ग, नाशिक फाटा चौक, भोसरीतील महादेव मंदिराजवळचा चौक, भोसरी-चऱ्होली रस्त्यावर ओढ्याच्या सखल ठिकाणी झालेली वाहतूककोंडी सोडविण्यासाठी भर पावसात खटाटोप करण्याची वेळ पोलिसांवर आली. कितीही प्रयत्न केला, तरी मोकळ्या रस्त्याने वेगात येणाऱ्या आणि पाणथळ जागी थबकणाऱ्या वाहनांमुळे ही कोंडी सोडविणे शक्य होत नव्हते. दुपारी २पर्यंत हीच स्थिती कायम होती. दुपारी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शहरवासीयांना थोडासा दिलासा मिळाला. सायंकाळी ४.३० नंतर पुन्हा पावसाच्या सरी कोसळ्यास सुरुवात झाली. सकाळच्या दयनीय परिस्थितीचीच पुनरावृत्ती पाहण्यास मिळाली. (प्रतिनिधी)