शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

रेटवडी-पिंपळगाव गटात धक्कादायक निकाल

By admin | Updated: February 24, 2017 02:13 IST

रेटवडी-पिंपळगाव जिल्हा परिषद गटात धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

दावडी : रेटवडी-पिंपळगाव जिल्हा परिषद गटात धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे या गटात विजयी होऊन माजी पंचायत समिती उपसभापती राजू जवळेकर यांचे पूर्व भागातील वर्चस्व संपुष्टात आले आहे.रेटवडी-पिंपळगाव गटामध्ये मोठी चुरशीची लढत झाली. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या उमेदवार निर्मला सुखदेव पानसरे व शिवसेनेच्या उमेदवार सुवर्णा मिसाळ/जवळेकर यांच्यात लढत झाली. पानसरे यांनी धक्कादायक निकालाची नोंद केली. तसेच याच गटातील दावडी गणातील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वैशाली गव्हाणे यांनी विजय मिळवला, तर रेटवडी गणातील शिवसेनेच्या उमेदवार सुभद्रा शिंदे या विजयी झाल्या आहेत. खेडचा पूर्व भागात राजू जवळेकर यांचा बालेकिल्ला होता. मागील दोन पंचवार्षिक निवडणुकीत पंचायत समितीला कॉँग्रेस पक्षातून निवडून आले होते. तसेच त्यांनी दोन पंचवार्षिक निवडणुकीत दोन उमेदवार जिल्हा परिषदेवर निवडून पाठविले होते. लोकसभा निवडणुकीदरम्यान राजू जवळेकर हे काँग्रेस पक्षातून शिवसेना या पक्षात गेले होते. त्यांनी पूर्व भागात शिवसेनेचा भगवा फडकावयचा प्रयत्न केला मात्र. या निवडणुकीत जवळेकर यांनी त्यांच्या भगिनी सुवर्णा मिसाळ यांचा शिवसेनत प्रवेश करून उमेदवारी दिली. विरोधी पक्षांनी बाहेरील उमेदवार म्हणून टीका केली. पानसरे यांना १५४७६ मते मिळाली, तर मिसाळ यांना १०९९० मते मिळाली. पानसरे निवडून आल्यामुळे जवळेकर यांचे या भागात वर्चस्व कमी झाले असल्याचे चित्र दिसत आहे. दावडी गणामध्ये राष्ट्रवादीचे कट्टर व माजी आमदार दिलीप मोहिते यांचे समर्थक, दावडी गावचे माजी सरपंच संतोष गव्हाणे यांच्या पत्नी वैशाली गव्हाणे यांनी शिवसेनेच्या उमेदवार छाया होरे यांचा पराभव केला आहे. त्यामुळे या भागात माजी आमदार दिलीप मोहितेसमर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. रेटवडी गणात शिवसेनेच्या सुभद्रा शिंदे यांनी ६६८८ मते घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या उमेदवार बिजली भालेकर यांचा पराभव केला आहे.बुचके यांचा चौथ्यांदा विजय नारायणगाव : नारायणगाव-वारुळवाडी गट व गणातून शिवसेनेचे तिन्ही उमेदवार विजयी झाल्याने या गटातील शिवसैनिकांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेनेच्या आशाताई बुचके, पंचायत समितीच्या नारायणगाव गणातून अर्चना माळवदकर व वारुळवाडी पंचायत समिती गणातून रमेश खुडे हे तिन्ही शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. नारायणगाव गटातून झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या आशाताई बुचके यांना १२ हजार ६९८ विजयी मते मिळाली. राष्ट्रवादीच्या राजश्रीताई बोरकर यांना ८ हजार ७१२ मते, अपक्ष उमदेवार सोनाली मकरंद पाटे ३ हजार ५७ मते व भाजपाच्या मनीषा पारेकर यांना ५५८, नोटा ३६५, अवैध १ मत, २५ हजार ३९० वैध ठरली. या गटात एकूण ३७ हजार ७४० मतदार होते, तर नारायणगाव पंचायत समिती या गणात १२ हजार ४३० मतदान वैध ठरले. शिवसेनेच्या अर्चना माळवदकर यांना ६ हजार ४९६ विजयी मते मिळाली, तर राष्ट्रवादीच्या प्रीती राजेश कोल्हे यांना ५ हजार ४९८ मते व नोटा ४३६ मते मिळाली. वारुळवाडी पंचायत समिती गणात शिवसेनेचे रमेश खुडे यांना ६ हजार ४१४ विजयी मते, राष्ट्रवादीचे सुशील सोनवणे यांना ४ हजार ६४५, भाजपाचे अभय वाव्हळ यांना ४९४, किरण पाटोळे २०१, विशाल रणदिवे ९६८, नोटा २३७, अवैध २. १२ हजार ९५९ मते वैध ठरली. विजयानंतर आशाताई बुचके म्हणाल्या, हा विजय केलेली विकासकामे व शिवसैनिकांच्या मेहनतीवर संपादन केला आहे.