ससूनमधील निवासी डॉक्टरांचा संप सोमवारपर्यंत स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:11 AM2021-04-18T04:11:38+5:302021-04-18T04:11:38+5:30

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ६० वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे सोमवारी (दि.१९) संध्याकाळपर्यंत संप मागे घेत असल्याची ...

Strike of resident doctors in Sassoon postponed till Monday | ससूनमधील निवासी डॉक्टरांचा संप सोमवारपर्यंत स्थगित

ससूनमधील निवासी डॉक्टरांचा संप सोमवारपर्यंत स्थगित

Next

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ६० वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे सोमवारी (दि.१९) संध्याकाळपर्यंत संप मागे घेत असल्याची दिली आहे. कालच पालकमंत्री अजित पवार यांनी ससूनमधले बेड वाढवणार नाही. अस जाहीर केलं होतं. पण आमच्यापर्यंत हा निर्णय लेखी पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही केवळ तातडीची सेवा पुरवू, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. डॉक्टरांच्या काही मागण्यांकडेही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने त्यांनी बारा तासांच्या आत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्याचे पडसाद महाराष्ट्रातील प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात उमटतील, असा इशारा प्रशासनाला दिला आहे. सध्या ससूनमध्ये ५५० कोरोना आणि ४५० इतर रुग्ण आहेत. मात्र निवासी डॉक्टरांची संख्या केवळ ४५० आहे. आणखी ३०० बेड वाढवले तर १०० डॉक्टरांची गरज भासणार आहे. आम्ही सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठीच आहोत. रुग्णसेवा अविरत चालू आहे. गेल्या एक दीड महिन्यापासून आमच्या काही मागण्या प्रलंबित आहेत. प्रशासन त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. डॉक्टरांच्या सर्व अडचणी आणि त्यावरील उपायही आम्ही प्रशासनाला सुचवून दिले आहेत. पण ते याची दखल घेत नाहीत. असेही त्यांनी सांगितले आहे.

Web Title: Strike of resident doctors in Sassoon postponed till Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.