वडगाव निंबाळकर : येथील पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठी आलेलेल्या दोन गटात पोलीस ठाण्यासमोरच हाणामारी झाल्याचा प्रकार सोमवारी (दि. १९) रात्री साडेनऊच्या सुमारास घडला. पूर्वीच्या वादातून दोन कुटुंबात किरकोळ कारणावरून हा प्रकार घडला. याबाबतची तक्रार देण्यासाठी एका गटातील लोक ठाण्यात गेले. यावेळी दुसरा गट बाहेर उभा होता. यावेळी अचानक बाहेर आरडा ओरडा सुरू झाला. आजुबाजूच्या परिसरातील लोक जमा झाले. ठाणेमधील कर्मचाऱ्यांना आवाज ऐकू आल्याने पोलीस बाहेर आले. आवारात सुरू असलेली भांडणे पाहुन त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराचे सीसीटीव्हीत चित्रीकरण झाले आहे. दोन गटातील वाद विकोपाला गेला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. मंगळवारी रात्री उशीरापर्यंत याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील म्हणाले, की भांडणाचा प्रकार घडला आहे. पण यामध्ये कोणी गंभीर जखमी नाही. दोन्ही बाजुच्या लोकांना आपल्या तक्रारी दाखल करण्यास सांगितले आहे.
पोलीस ठाण्याच्या आवारातच हाणामारी; पुणे जिल्ह्यातील वडगाव निंबाळकरमधील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 18:52 IST
वडगाव निंबाळकर येथील पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठी आलेलेल्या दोन गटात पोलीस ठाण्यासमोरच हाणामारी झाल्याचा प्रकार सोमवारी (दि. १९) रात्री साडेनऊच्या सुमारास घडला.
पोलीस ठाण्याच्या आवारातच हाणामारी; पुणे जिल्ह्यातील वडगाव निंबाळकरमधील प्रकार
ठळक मुद्देपूर्वीच्या वादातून दोन कुटुंबात किरकोळ कारणावरून घडला प्रकार भांडणाचा प्रकार, यामध्ये कोणी गंभीर जखमी नाही : सचिन पाटील