शहरं
Join us  
Trending Stories
1
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
2
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
3
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
4
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
5
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
6
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
7
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
8
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
9
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
10
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
11
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
12
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
13
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
14
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
15
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
16
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
17
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
18
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
19
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
20
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

दहावीच्या परीक्षेत खेळाडूंचीही भरारी

By admin | Updated: June 23, 2014 01:19 IST

राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत यशस्वी कामगिरी करीत खेळाडू विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेतही बाजी मारली

मिलिंद कांबळे, पिंपरीराज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत यशस्वी कामगिरी करीत खेळाडू विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेतही बाजी मारली. केवळ खेळाडूंसाठी असलेल्या शहरातील महापालिकेच्या क्रीडा प्रबोधिनी विद्यालय आणि ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाच्या क्रीडाकुलाचा एकूण निकाल १०० टक्के लागला. शालेय व क्रीडा संघटनांच्या विविध स्पर्धांत वर्षभर सहभागी होऊन खेळाडूंनी यश मिळविले. अनेक खेळाडू स्पर्धेसाठी १५ दिवस बाहेरगावी होते. वर्षात किमान तीन ते चार स्पर्धांत प्रत्येक खेळाडूने सहभाग नोंदविला. मैदानावर दररोज सराव करीत त्यांनी घाम गाळला. दररोज किमान २ तास सराव केला. दहावीत असूनही त्यांनी सरावाकडे दुर्लक्ष केले नाही.शिक्षकांनी त्याच्यावर अधिक लक्ष केंद्रित केले. शिक्षकांच्या मदतीने त्यांनी शिल्लक अभ्यासक्रम पूर्ण केला. सराव व स्पर्धा काळातील अभ्यासक्रम भरून काढत त्यांनी उर्वरित काळात अभ्यासाकडे लक्ष दिले. राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांत चमकणाऱ्या खेळाडंूनी दहावीतही उल्लेखनीय कामगिरी केली. उद्यमनगर, पिंपरी येथील क्रीडा प्रबोधिनी विद्यालयाच्या ओंकार पालांडे याने ९२.२० टक्के गुण घेत शाळेत प्रथम क्रमांक पटकाविला. महापालिकेच्या १ लाख रुपये बक्षिसास तो पात्र ठरला आहे. ऋषिकेश धडके याने ८६.८० टक्के गुण मिळवून शाळेत दुसरा क्रमांक प्राप्त केला. त्याने ५० हजार रुपयांचे बक्षीस मिळविले आहे, तर समीक्षा गोळे हिने ७७.८० टक्के गुण मिळविले.हे सर्व अ‍ॅथलेटिक्स खेळाडू आहेत. पालांडे हा उंच उडीचा राज्यस्तरीय खेळाडू आहे. राज्यस्तरीय खेळाडू धडके याचा अडथळा शर्यत हा क्रीडा प्रकार आहे. गोळे ही धावपटू आहे. ती राज्य स्पर्धा पदकविजेती आहे. दहावीच्या वर्गात एकूण ३८ विद्यार्थी होते. ते सर्व चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. शिवाय त्यांची वर्षभरातील क्रीडा कामगिरीही प्रशंसनीय आहे. २०१२ ला १०० टक्के व गेल्या वर्षी ९६ टक्के निकाल होता. आठ वर्षांतील निकाल पाहता खेळाडूंनी शैक्षणिक प्रगतीही उंचावली आहे, अशी माहिती मुख्याध्यापक बाळासाहेब सातव यांनी दिली. निगडी येथील ज्ञान प्रबोधिनीच्या क्रीडाकुलातील संकल्प कुलकर्णी याने ९१.२० टक्के गुण घेत शाळेत प्रथम क्रमांक मिळविला. तो राज्य योगासन स्पर्धेतील विजेता खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय योगापटू असलेल्या साक्षी महाले हिने ८८.८० टक्के गुण प्राप्त करीत दुसरे स्थान मिळविले. महाले हिची दक्षिण आफ्रिका येथे होणाऱ्या चौथ्या आशियाई योगा स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. मुग्धा कुलकर्णी हिने ८५.६० टक्के गुण मिळवीत तिसरा क्रमांक मिळविला. ती कबड्डी व अ‍ॅथलेटिक्स खेळाडू आहे. कबड्डीत राज्यस्तरावर आणि तिहेरी उडी व ४ बाय १०० मीटर रिले धावणे प्रकारात राज्य स्तरावर यश मिळविले आहे. आंतरराष्ट्रीय योगपटू वैष्णवी आंद्रे हिने रशिया व पॅरिस येथे झालेल्या दोन्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत १४ व १७ वर्षांखालील गटात प्रत्येकी रौप्यपदक जिंकले. तिने दहावीत ७७ टक्के गुण कमावले. अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय व राज्य स्पर्धेत यशस्वी कामागिरी केली आहे. त्यांनी ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करीत अभ्यासातही चमकदार कामगिरी केली आहे. यंदा एकूण ३१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तीन वर्षांपासून शाळेचा निकाल १०० टक्के आहे, अशी माहिती क्रीडाकुल प्रमुख भगवान सोनवणे यांनी दिली.