भोर : एसटीचा तोटा भरून काढण्यासाठी, तसेच उत्पन्नवाढीसाठी कामगार संघटनेने सुचवलेल्या उपाययोजनांची दखल घ्यावी, तसेच एसटी कामगार संघटनेच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या वतीने धरणो आंदोलन करण्यात आले.
राज्य एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण व सरचिटणीस हनुमंत ताटे यांच्या नेतृत्वाखाली हे धरणो आंदोलन करण्यात आले. भोर एसटी डेपोत संघटनेचे अध्यक्ष दिलीप वरे, सचिव मोहन जेधे, तसेच कर्मचारी या वेळी उपस्थित होते.
डिङोलच्या दरात वारंवार होणारी वाढ, टायर व सुटय़ा भागांच्या किमतीत झालेली वाढ, समपातळीवर नसलेली प्रवासी वाहतूक स्पर्धा, शासनाचे प्रतिकूल धोरण यामुळे गेल्या वर्षभरापासून एसटीला तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे एसटीचे उत्पन्न वाढविण्याची गरज आहे.
प्रवाशांच्या गरजेप्रमाणो नवीन गाडय़ा महामंडळाच्या ताफ्यात दाखल कराव्या. मनुष्यबळ अभावामुळे, विस्तार रोखला जात आहे. न्यायालयीन निर्णयानुसार अवैध खासगी प्रवासी वाहतुकीवर संपूर्ण बंदी आणली जात नाही.
त्यामुळे जवळपास 5क्क् कोटींच्या उत्पन्नापासून महामंडळाला वंचित राहावे लागत आहे. ही भरपाई शासनाने द्यावी, तोटय़ातील डेपो बंद करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा. मॅक्सीकॅबसारख्या छोटय़ा वाहनांना प्रवासी वाहतुकीचा परवाना देण्याचा प्रस्ताव मागे घ्यावा, यासारख्या असंख्य मागण्या या वेळी करण्यात आल्या. या मागण्या मान्य करण्यासाठी संघटना टप्प्याटप्प्याने व्यापक आंदोलन करणार आहे.