शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

कसबा मतदारसंघात स्त्रीशक्ती प्रबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 18:37 IST

पुणे जिल्हा निवडणुक शाखेने नुकतीच ३१ जानेवारी २०१९ पर्यंतची जिल्ह्याची मतदार यादी जाहीर केली.

ठळक मुद्देपुरुषांपेक्षा स्त्री मतदारांची संख्या जास्त : भोसरीत सर्वात कमी महिला मतदारजिल्ह्यात खडकवासला मतदार संघात स्त्री मतदारांची संख्या ९०० वरुन ८७९वर खाली घसरली

पुणे : जिल्ह्यामध्ये कसबा मतदार संघात महिला मतदारांचे प्रमाण हे पुरुषांपेक्षा देखील अधिक आहे. त्यामुळे केवळ याच मतदार संघामध्ये स्त्री मताला अधिक मान असल्याचे दिसून येत आहे. येथे दरहजारी पुरुष मतदारांमागे तब्बल १ हजार १७ स्त्री मतदार आहेत. जिल्ह्याची दरहजारी पुरुष मतदरांमागील स्त्री मतदारांची सरासरी केवळ ९१२ इतकी आहे. पुणे जिल्हा निवडणुकशाखेने नुकतीच ३१ जानेवारी २०१९ पर्यंतची जिल्ह्याची मतदार यादी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यात ३८ लाख ५१ हजार ४४५ पुरुष आणि ३५ लाख १२ हजार स्त्री मतदार आहेत. तर, भिन्न लिंगी मतदारांची संख्या १३९ इतकी आहे. एकूण जिल्ह्यात ७३ लाख ६३ हजार ८१२ मतदार आहेत. लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत शहरात पुरुष मतदारांची संख्या ३६ लाख ४४ हजार ६९५ अणि स्त्री मतदारांची संख्या ३२ लाख ८३ हजार ५६ इतकी होती. त्यावेळी दरहजारी पुरुषांमागे ९०१ स्त्री मतदार होत्या. त्या तुलनेत गेल्या पाच वर्षांत सरासरीत ९१२ महिला अशी वाढ झाली आहे. कसबा मतदार संघात २०१४च्या निवडणुकीवेळी १ लाख ३७ हजार २४२ पुरुष आणि १ लाख ३७ हजार ८३९ स्त्री मतदार होत्या. त्यावेळी देखील पुरुषांच्या तुलनेत स्त्री मतदार अधिक होते. दरहजार पुरुषांमागे त्यावेळी १ हजार ४ स्त्री मतदार होत्या. या निवडणुकीत भोसरी मतदार संघात दरहजारी पुरुषांमागे सर्वात कमी ८२२ स्त्री मतदार आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत स्त्री मतदारांमध्ये सरासरीच्या तुलनेत १९ स्त्री मतदारांची वाढ झाली आहे. या निवडणुकीत भोसरीतील २लाख १९ हजार १४५ पुरुष आणि १ लाख ८० हजार ८१ स्त्रिया मतदान करतील. जिल्ह्यात खडकवासला मतदार संघात स्त्री मतदारांची संख्या ९०० वरुन ८७९वर खाली घसरली आहे. या पुर्वीच्या लोकसभा निवडणुकीवेळी खडकवासल्यामध्ये २ लाख २५ हजार ४३१ पुरुष आणि २ लाख २ हजार ८१० स्त्री मतदार होते. त्यात पुरुष मतदारांच्या संख्येत २ लाख ४६ हजार ११७ पर्यंत वाढ झाली. तर  स्त्री मतदारांची संख्या केवळ २ लाख १४ हजार ४५७ पर्यंत वाढली आहे.   

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकWomenमहिला