शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

सांस्कृतिक आक्रमण थोपवणे प्रत्येकाचीच जबाबदारी- डॉ. प्रभा अत्रे

By राजू इनामदार | Updated: October 7, 2023 18:32 IST

संस्कार भारतीच्या अखिल भारतीय कार्यकारिणीची बैठक...

पुणे : विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात त्याचा वापर करून अनेक सांस्कृतिक आक्रमणे होत असतात. ती थोपवणे हे प्रत्येक नागरिकाचे काम आहे. संस्कार भारती संस्थात्मक स्वरूपात ते काम करते आहे ही उल्लेखनीय बाब आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध शास्त्रिय संगीत गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी केले.

सांस्कृतिक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या ‌‘संस्कार भारती‌’ या संस्थेच्या अखिल भारतीय कार्यकारिणीची तीन दिवसांची बैठक पुण्यात नुकतीच झाली. डॉ. अत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीची सुरूवात करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष, प्रसिद्ध चित्रकार वासूदेव कामत, अखिल भारतीय महामंत्री डॉ. अश्विन दळवी, उपाध्यक्ष प्रसिद्ध व्हायोलिन वादक डॉ. मैसुर मंजुनाथ, उपाध्यक्षा डॉ. हेमलता मोहन व्यासपीठावर होते.

समारोपाच्या भाषणात कामत यांनी मोबाईल सेल्फी यांच्या अतिवापराचा धोका स्पष्ट केला. सेल्फी काढणे किंवा सतत फोटो काढत राहणे यामुळे त्या विषयावर अथवा एखाद्या सुंदर कलाकृतीवर लक्ष केन्द्रित करण्याऐवजी सर्व लक्ष मोबाईलमधेच असते, त्यामुळे तो विषय त्याला समजतच नाही. यामुळे सर्जनशीलता कमी झाली आहे असे निरिक्षण त्यांनी नोंदवले.

‘राष्ट्रभक्तिकी भागीरथी' हा संघ गीतांवर आधारीत भरत नाट्यम आणि कथ्थक शैलीतील नृत्यरचनांमधून कार्यक्रम सादर करण्यात आला. नृत्यगुरु आस्था कार्लेकर, मैत्रेयी बापट, डॉ. स्वाती दैठणकर, अरुंधती पटवर्धन, डॉ. स्वाती दातार, सुवर्णा बाग आणि त्यांच्या शिष्यांनी नृत्य सादर केले. अभिनेते राहुल सोलापूरकर, प्रांजली देशपांडे यांनी सुत्रसंचालन केले.

बौद्धिक प्रमुख स्वांतरंजन, संघटन मंत्री अभिजीत गोखले, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सतार वादक उस्ताद उस्मान खान, पुणे महानगराचे अध्यक्ष व्हायोलिन वादक पंडित अतुलकुमार उपाध्ये यांची प्रमुख उपस्थिती होती. सिने दिग्दर्शक व मार्गदर्शक राजदत्त, डॉ गो. बं. देगलूरकर, संघटन मंत्री अभिजित गोखले, डॉ रवींद्र भारती, नाट्य दिग्दर्शक प्रमोद पवार तसेच इतर मान्यवर पदाधिकारी असे २४८ कलाकार कार्यकर्ते बैठकीला अखिल भारतातून उपस्थित होते.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड