शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता रुंदीकरणासाठी रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 02:59 IST

महादजी शिंदे रस्ता ३० मीटर रुंद करण्याची मागणी

पाषाण : औंध येथील महादजी शिंदे रस्ता रुंदीकरण करून तो ३० मीटरपर्यंत करावा, या मागणीसाठी महादजी शिंदे कृती समितीच्या वतीने शनिवारी दुपारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. येथे २४ मीटर रस्ता करण्यात येणार असून, त्यामुळे मोठी वाहतूककोंडी होणार आहे. म्हणून त्याच्या विरोधात नागरिकांनी एकत्र यावे, असेही आवाहन या वेळी कृती समितीने केले आहे.स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये, महादजी शिंदे मार्ग १८ मीटर (६० फूट) ते ३० मीटर (१०० फूट) पर्यंत विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. तज्ज्ञ समितीच्या शिफारशीप्रमाणे आणि टाऊन प्लॅनिंगचे संचालक, विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी शिफारस केली होती. परंतु, राज्य सरकारने फेब्रुवारी २०१८ मध्ये काही घटकांच्या मागणीनुसार रुंदीकरण ३० मीटरवरून २४ मीटरपर्यंत करण्याचा निर्णय दिला. त्याला नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात औंध नागरिकांनी एक बैठक घेऊन उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. अ‍ॅड. राजेंद्र अनभुले यांनी ती दाखल केली असून, येत्या २० आॅगस्ट रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. याचिका दाखल केल्यानंतर येणाऱ्या खर्चासाठी निधी जमा करण्यासाठी आवाहन केले आहे. सुमारे ५ लाख रुपये जमा करण्यात येणार आहेत.प्रस्तावित अरुंद रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. जर हा रस्ता ३० मीटर झाला नाही, तर येथील कोंडीत भरच पडणार आहे. तसेच वायू प्रदूषणही वाढणार आहे. त्यामुळे शाळेत जाणारी मुले, ज्येष्ठ नागरिक, सायकलस्वार, दुचाकीस्वार यांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे. अरुंद रस्त्यामुळे परिसरात आपत्कालीन सेवा रुग्णवाहिका, फायर ब्रिगेड, डॉक्टर, पोलीस मदत त्वरित पोचण्यास विलंब लागणार आहे. त्यामुळे हा रस्ता ३० मीटर झाला पाहिजे, अशी नागरिकांची मागणी आहे.आंदोलनावेळी महादजी शिंदे रोड कृती समितीचे नितीन राणे, नगरसेविका अर्चना मुसळे, मधुकर मुसळे, मयूर मुंडे, विद्यासागर भापकर अरुण भापकर, प्रशांत थोरात, अशोक पाठक, विकास नाडकर्णी, मंगेश घुगे, विनय शामराज, हिरामण ठोंबरे, मिलिंद कदम, संजय काकड आदी उपस्थित होते. रास्ता रोको आंदोलनामुळे औंध परिसरात वाहतूककोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.मधुकर मुसळे म्हणाले, महादजी शिंदे रस्ता रुंदीकरण झाले पाहिजे. परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. रस्ता ३० मीटर करण्यासाठी पालकमंत्री यांना मागणी करणार आहे. दरम्यान, आंदोलनावेळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.रहिवाशांनी एकत्र येऊन लढावेऔंधच्या रहिवाशांनी एकत्र येऊन या अन्यायाविरुद्ध लढण्याची मागणी केली जात आहे. प्रस्तावित रुंदीच्या रुंदी कमी करण्याचा निर्णय धोकादायक आहे आणि रहिवाशांच्या गुणवत्ता आणि सुरक्षेसाठी गंभीर धोका आहे. कायदेशीरपणे लढण्यासाठी आणि आपल्यातील एकता दर्शविण्याकरिता एकत्र येण्याचे आवाहन कृती समितीतर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकPuneपुणे