शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा चोरले चंदनाचे झाड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 03:01 IST

२५ तारखेला गुरुवारी रात्री दीडच्या दरम्यान मेनगेटपासून फक्त १०० फुटावरून चोरट्यांनी चंदनाचे अख्खे झाडच तोडून नेले.

कात्रज : जगभरातील प्रेक्षकांचे पुण्यात आल्यावर आवर्जून भेट देण्याचे ठिकाण म्हणजेच कात्रज प्राणिसंग्रहालय. सध्या वेगवेगळ्या चोऱ्यांमुळे कुप्रसिद्ध होऊ लागले आहे. २५ तारखेला गुरुवारी रात्री दीडच्या दरम्यान मेनगेटपासून फक्त १०० फुटावरून चोरट्यांनी चंदनाचे अख्खे झाडच तोडून नेले. मात्र रामभरोसे सुरक्षा असलेल्या येथील कर्मचाºयाला चोरटे पळून गेल्यावर चोरीची माहिती झाली. विशेष म्हणजे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या तोंडावरच हा प्रकार घडला आहे.मागील डिसेंबर महिन्यात देखील या ठिकाणी दोन वेळा येथील चंदनाची झाडे चोरट्यांनी तोडून नेली, त्याचे सीसीटीव्ही फुटेजदेखील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील कर्मचाºयांना मिळाले मात्र या चोरांना पकडण्यात अजून यश येथील पोलिसांना आले नाही. या वेळी तर चोरट्याने या ठिकाणी बसवलेल्या लाखो रुपयाच्या सीसीटीव्हीमध्ये आपण येणार नाही याची पक्की काळजी घेतली आहे.कारण एकाही सीसीटीव्हीमध्ये हे चोरटे दिसले नाहीत. सैनिक इंटेलिजन या कंपनीकडे येथील सुरक्षिततेची जबाबदारी दिली आहे. कारण या पूर्वी स्पायडर कंपनीची सुरक्षितता होती. त्या वेळीही चोरी झाल्यामुळे येथील सुरक्षा यंत्रणा बदलण्यात आली. या चोरीच्या वेळी सैनिकचे पाच व मनपाचे दोन कर्मचारी रात्रपाळीला कामावर होते. रजिस्टर नोंदी असल्यामुळे किती कर्मचारी खरे हजर असतात या विषयी संशय निर्माण होतो.या सर्व प्रकारामुळे कोट्यवधी रुपये पालिकेला कमवून देणारे व सुमारे १८ लाख प्रेक्षक असलेल्या या प्राणिसंग्रहालयाच्या सुरक्षिततेसाठी पालिका प्रशासन आता काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.नाही दिवे, नाही सीसीटीव्हीसैनिकचे कर्मचारी रवी माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की ज्या ठिकाणी मागच्या वर्षी ज्या ठिकाणचे झाड चोरले गेले आहे त्याच्याच बाजूचे हे झाड चोरले गेले आहे. या ठिकाणी लाईटदेखील नाही. तसेच सीसीटीव्हीदेखील बसवला गेलेला नाही. तसेच या संग्रहालयाच्या अनेक भिंतीदेखील तुटलेल्या आहेत.

टॅग्स :Puneपुणे