शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचार थांबविण्यासाठी स्टिंग

By admin | Updated: April 25, 2017 03:55 IST

मी निर्माता, निर्देशक आहे; हिरो नाही. माझे हिरो जिल्ह्याच्या ३६ पोलीस ठाण्यांत काम करणारे कर्मचारी आहेत. त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करा

घोडेगाव : मी निर्माता, निर्देशक आहे; हिरो नाही. माझे हिरो जिल्ह्याच्या ३६ पोलीस ठाण्यांत काम करणारे कर्मचारी आहेत. त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करा, असे म्हणत पोलिसांना बळ देऊ पाहणारे पुणे ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी पोलिसांमधील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी स्टिंग आॅपरेशन करणार असून त्यात दोषी आढळणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार असल्याचा थेट इशारा जिल्ह्यातील पोलिसांना दिला आहे. पुणे ग्रामीणमधील पत्रकारांकडून सूचना, अभिप्राय व त्यांची पोलिसांविषयीची मते जाणून घेण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक राम शिंदे हेदेखील उपस्थित होते. त्यांनी जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील प्रमुख वार्ताहरांकडून परिस्थिती जाणून घेतली. या वेळी अनेक पत्रकारांनी पोलिसांच्या तक्रारी मांडल्या. एवढ्या तक्रारी ऐकून पोलीस अधीक्षकदेखील अचंबित झाले. या सर्व तक्रारी सोडविण्यासाठी पुढील चार महिने मला पुरणार नाहीत, असे मत त्यांनी व्यक्त केले. या वेळी सुवेझ हक यांनी सांगितले, की पोलिसांमधील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी स्टिंग आॅपरेशन सुरू केली आहेत. काही दिवसांपूर्वी इंदापूरजवळ चेक पोस्टवर काही पोलीस कर्मचारी रात्रीच्या वेळी हप्ते वसूल करतात, अशी तक्रार आली. यावर रात्री आम्ही आमचे कर्मचारी पाठवून स्टिंग आॅपरेशन केले. त्यात तो कर्मचारी दोषी आढळला. त्याला लगेच निलंबित केले. अशा प्रकारचे स्टिंग आॅपरेशन येथून पुढे सतत केले जाणार व त्यात दोषी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार. पोलिसांनी चांगले काम केले, तर निश्चित त्याचे कौतुक होईल व जर वाईट केले काम केले, तर त्यावर कारवाई केली जाईल.तसेच, पुणे ग्रामीणमधील पोलीस ठाण्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून लोकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी काम करणार आहे. यासाठी पुणे ग्रामीणच्या ३६ पोलीस ठाण्यांमध्ये काम करणाऱ्या तीन हजार लोकांमध्ये मला बदल करायचा आहे, हे माझ्यापुढे मोठे आव्हान असल्याचे मला वाटते. गावागावांत सीसीटीव्ही बसल्यामुळे गुन्हेगारी मोडून निघण्यासाठी मोठी मदत होईल. (वार्ताहर)