शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

पाण्यासाठी स्वार्थी लोकांपासून दूर राहा

By admin | Updated: March 27, 2017 02:14 IST

दौंडच्या पूर्व भागातील शेतीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वार्थी लोकांपासून दूर रहावे, असे आवाहन कामगार नेते शिवाजी काळे यांनी

दौंड : दौंडच्या पूर्व भागातील शेतीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वार्थी लोकांपासून दूर रहावे, असे आवाहन कामगार नेते शिवाजी काळे यांनी केले.आलेगाव येथे खडकवासला कालव्याच्या पाण्याचे पूजन प्रसंगी ते बोलत होते. सोनवडी व खोरवडी येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाण्याचा फार मोठा उपयोग होतो. या बंधाऱ्यातून पूर्व भागातील सुमारे २५ ते ३० गावांतील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचा उपयोग होतो. परंतु हक्काचे पाणी मिळविण्यासाठी गेल्या ५ वर्षांपासून शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. परंतु तालुक्यातील काही स्वार्थी व्यक्ती या भागात पाणी मिळू नये, यासाठी राजकारण करीत आहेत. तेव्हा अशा राजकीय लोकांपासून शेतकऱ्यांनी दूर रहावे. भीमा नदीमुळे नदीकाठच्या गावांना वर्षभर पुरेसे पाणी मिळते मात्र उन्हाळ्यामध्ये टंचाईच्या काळात या भागातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. परिणामी सोनवडी आणि खोरवडी येथील बंधाऱ्यातील पाणी शेतीसाठी वरदान ठरते. मात्र अलीकडच्या काळात हक्काचे पाणी स्थानिक शेतकऱ्यांना मिळत नसल्याने या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट, रासपाचे आमदार राहुल कुल, भाजपाचे ज्येष्ठ नेते वासुदेव काळे यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी भामा आसखेडचे पाणी भीमा नदीत सोडण्यात आले. परंतु जादा सोडलेले पाणी काही स्थानिक लोकांनी बंधाऱ्यांना ढापे टाकून अडविल्याने हे पाणी शेवटपर्यंत पोहचू शकले नाही; तरी देऊळगावराजे, शिरापूर या भागात पाणी पोहोचणे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, असे काळे म्हणाले. या वेळी भाऊसाहेब काळे, सुभ्रदा काळे, उमेश काळे, राहुल चितारे, माणिक काळे, अशोक कदम, गोविंद कदम, श्रीकांत गुणवरे, शिवाजी ढमढेरे, मोहन काळे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)