शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

राज्यातील लिव्ह अँड लायसन दस्तनोंदणी एप्रिल अखेरपर्यंत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे, मुंबईसह संपूर्ण राज्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढत आहे. यामुळेच शासनाने कडक निर्बंध ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे, मुंबईसह संपूर्ण राज्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढत आहे. यामुळेच शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. परंतु, अद्यापही सर्वच मोठ्या शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये विविध प्रकारचे दस्तनोंदणी करण्यासाठी प्रचंड गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यातील लिव्ह अँड लायसन्स दस्तांची कार्यालयातील नोंदणी एप्रिल अखेरपर्यंत बंद केली आहे. तसेच नियमित दस्त नोंदणीसाठी देखील अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत.

नोंदणी महानिरीक्षक यांनी काढलेल्या आदेशानुसार सद्यस्थितीत राज्यात कोरोना विषाणूचा प्रादर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. यासाठी राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विभागाने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने व दस्तनोंदणीच्या सोईसाठी विभागात काही ऑनलाईन सेवा उपलब्ध आहेत. या ऑनलाईन सेवांचा नागरिकांनी वापर करुन दुय्यम निबंधक कार्यालयातील गर्दी कमी करावी. याशिवाय काही सेवा व सुविधांचा वापर करण्याचे अनिवार्य केले आहे. त्याचा वापर करून दस्त नोंदणीसाठी यावे व शासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहेत.

आता दस्त नोंदणीसाठी असतील हे निर्बंध

- नागरिकांनी या विभागाच्या संकेतस्थळावर असलेल्या दस्तनोंदणीकरता पीडीईद्वारे डाटा एंट्री करणे अनिवार्य केलेले आहे. यापुढे दुय्यम निबंधक कार्यालयातील डेटा एंट्री किंवा दुरुस्त्या पूर्णपणे थांबविण्यात येत आहेत. डाटा एंट्री करणे अनिवार्य केलेले आहे. यापुढे दुय्यम निबंधक कार्यालयातील डेटा एंट्री किंवा दुरुस्त्या पूर्णपणे थांबविण्यात येत आहेत.

- नागरिकांनी सदर पीडीई डेटा एंट्री करून दस्त नोंदणीसाठी या विभागाच्या वेबसाईट वर eStep-in या प्रणालीद्वारे दुय्यम निबंधक कार्यालयातील उपलब्ध असलेली सोईची वेळ ऑनलाईन आगाऊ बुक करून किंवा कार्यालयीन दूरध्वनीवर/ समक्ष संपर्क साधून वेळ आरक्षित करणे अनिवार्य केले आहे. कोणत्याही परिस्थितीत आगाऊ वेळ आरक्षीत केली नसल्यास (walking) दस्त नोंदणी होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

- नागरिकांनी दस्ताचे निष्पादन घरी किंवा कार्यालयाच्या बाहेरच करावे व प्रत्येक व्यक्तीने सह्यांसाठी स्वतःचे पेन आणणे, एकच पेन एकमेकात सह्यांसाठी वापरू नये, आरक्षित वेळेलाच कार्यालयात हजर रहावे, मास्क लावल्या शिवाय कोणत्याही व्यक्तीला कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही.

- विभागाच्या वेबसाईट वर लिव्ह अँड लायसन ई-रजिस्ट्रेशन प्रणालीचा पर्याय उपलब्ध असल्याने लिव्ह अँड लायसन दस्ताची कार्यालयातील नोंदणी (फिजिकल रजिस्ट्रेशन) पुढील आदेशापर्यंत थांबवण्यात येत आहे.

- सद्यस्थितीत दस्त नोंदणीसाठी मोठ्या शहरात उदा.मुंबई ठाणे पुणे व इतर ठिकाणी सकाळ, दुपार दोन सत्रात कार्यालये सुरु आहेत. त्या ऐवजी अशा सर्व दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजाची वेळ नियमित सत्रात म्हणजेच ९.४५ ते ६.१५ या वेळेत सुरू राहतील. याशिवाय जी दुय्यम निबंधक कार्यालय दस्त नोंदणीसाठी शनिवार व रविवार सुटीच्या दिवशी सुरु होते. त्याचे कामकाज शनिवार रविवारी बंद करण्यात येत असून त्या कार्यालयांचे कामकाज सोमवार ते शुक्रवार पाच दिवस नियमित सुरू राहील.