शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

राज्य पत्रकार संघाला विजेतेपद

By admin | Updated: June 10, 2017 02:05 IST

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व आदिनाथ क्रिकेट क्लब भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत राज्य

लोकमत न्यूज नेटवर्कभोसरी : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व आदिनाथ क्रिकेट क्लब भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत राज्य मराठी पत्रकार संघाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संघाचा आठ गडी राखून पराभव करीत विजेतेपद पटकविले. तृतीय क्रमांक पोलीस संघाने पटकाविला.नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमवर क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके यांच्या हस्ते झाले. या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, विठ्ठल कुबडे, मधुसुदन घुगे, बाळासाहेब अंतरकर, संदीप मांडवी उपस्थित होते.अंतिम सामन्यात महपालिकेचे कर्णधार सुनील रेणुसे यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. निर्धारित ८ षटकांत ६६ धावा केल्या. महापालिकेकडून राहुल चावारियाने १९, महेश कुडळेने १८ तर सचिन लोणेने १० धावा केल्या. पत्रकार संघाकडून सचिन शिंदेने १७ धावांत २ गडी, पराग कुंकुलोळने १४ धावांत १ गडी बाद केला. ६७ धावांचा पाठलाग करताना राज्य पत्रकार संघाकडून सलामीचे फलंदाज विजय जगदाळे व सागर बाबर यांनी सुरेख फटकेबाजी केली. जगदाळेने १७, बाबरने २२ आणि आशुतोष सिंगने नाबाद १३ धावा करीत संघास विजेतेपद पटकावून दिले. संजय माने, नितीन शिंदे यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. पालिकेच्या संघाकडून सुनील रेनुसेने २२ धावांत १ गडी, राहुल चावारियाने १२ धावांत १ गडी बाद केला. स्पर्धेत तृतीय क्रमांक पोलीस संघाने पटकाविला.