शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसरकारला शिवसृष्टी साकारायची आहे की नाही ? विरोधकांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 21:19 IST

शिवसृष्टीचे आश्वासन देत सरकारने महापालिकेचा कोथरूड येथील कचरा डेपोचा भूखंड मात्र मेट्रोसाठी बळकावला असल्याचा आरोप करत त्यावरून सरकारचा हेतू लक्षात येतो.

ठळक मुद्देविरोधकांचा सवाल: हेतूविषयी घेतली जात आहे शंकाराज्य सरकारकडून शिवसृष्टीचे आश्वासन देत पुणेकरांची फसवणूकच

पुणे: राज्य सरकारने शिवसृष्टीचे आश्वासन देत पुणेकरांची फसवणूकच केली आहे. या सरकारला शिवसृष्टी करायचीच नाही असेच काही गोष्टींवरून सिद्ध होत आहे, असा आरोप करत महापालिकेतील विरोधकांनी बुधवारी सरकारवर तोफ डागली. मालमत्ता व्यवस्थापन विभागाने शिवसृष्टीपोटी द्याव्या लागणाऱ्या नुकसान भरपाईच्या ४५० कोटी रूपयांच्या आकडेवारीचा आधार त्यासाठी विरोधकांनी घेतला.राज्य सरकारने महापालिकेला शिवसृष्टीसाठी कोथरूड येथील बीडीपी आरक्षित ( जैवविविधता) ६५ एकर जागा देऊ केली आहे. त्यावरील बीडीपीचे आरक्षण काढून टाकण्याचे तसेच खासगी जागा मालकांना द्यायच्या नुकसान भरपाईबाबत तोडगा काढण्याचे आश्वासनही थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेतील भारतीय जनता पार्टीच्या सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही दिले आहे. ते फसवे असल्याचा आरोप बुधवारी विरोधी पक्षनेते चेतन तुपे व काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केला. सरकारला महापालिकेची शिवसृष्टी होऊ द्यायचीच नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.त्याच्या पुष्ट्यर्थ शिंदे यांनी महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाने स्वत:हून सर्व गटनेत्यांना दिलेली नुकसान भरपाईची आकडेवारी त्यांनी दाखवली. या जागेवरील खासगी जागा मालकांना एकूण ४३७ कोटी ४७ लाख, ९० हजार ६२२ रूपये द्यावे लागणार आहेत असे या आकडेवारीमध्ये मालमत्ता व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले आहे. ही आकडेवारी कोणीही मागितली नव्हती. महापालिकेला ही नुकसान भरपाई देणे शक्य नाही असे दर्शवण्यासाठीच ती स्वत: होऊन दिली गेली आहे, असे शिंदे म्हणाले. वास्तविक ही जबाबदारी सरकारची आहे. त्यांनी हे सरकारला कळवावे व त्यांच्याकडून याचे उत्तरही मागावे. विरोधकांना नुकसान भरपाईची रक्कम सांगण्याचे कारणच नाही असे ते म्हणाले.सत्ताधाऱ्यांशी संबधित एका बांधकाम व्यावसायिकाने तिथे गरीब जागा मालकांकडून त्यांच्या जागा कवडीमोल भावाने विकत घेतल्या. आता त्याची भरपाई करण्यासाठी म्हणून हा डाव रचला जात आहे. साडेचारशे कोटी रूपयांपैकी निम्मी रक्कम या एकाच बांधकाम व्यावसायिकाला मिळेल इतक्या जागा त्यांच्याच आहे असे तुपे व शिंदे यांनी सांगितले. महापालिकेला ही रक्कम देता येणे शक्य नाही, सरकार ती देणार नाही अशा परिस्थितीत शिवसृष्टी होईल का असा प्रश्न त्यांनी केला. त्या जागेवरचे बीडीपी आरक्षण बदलण्यासाठीही सरकारने अद्याप काहीही पावले उचलली नाहीत याकडे त्यांनी लक्ष वेधले.पुण्यातीलच एका खासगी संस्थेच्या शिवसृष्टीला सरकारने अलिकडेच वेगवेगळ्या माध्यमातून तब्बल ३०० कोटी रूपयांची मदत केली असल्याचेही शिंदे व तुपे म्हणाले. त्यावरून सरकारचा हेतू लक्षात येतो. संबधित जागेच्या आरक्षणात शिवसृष्टीसाठी आरक्षण असा बदल करण्याची मागणी करणारा प्रस्ताव महापालिकेच्या शहर सुधारणा समितीकडे पाठवला होता. तो मंजूर करण्याऐेवजी त्यांनी अभिप्रायार्थ म्हणून प्रशासनाकडे पाठवला. यावरूनही त्यांना त्या जागेवर शिवसृष्टी करायचीच नाही असेच दिसत असल्याची टीका शिंदे व तुपे यांनी केली. शिवसृष्टीचे आश्वासन देत सरकारने महापालिकेचा कोथरूड येथील कचरा डेपोचा भूखंड मात्र मेट्रोसाठी बळकावला असल्याचा आरोप त्यांनी केला. 

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका